महत्वाच्या सुचना
१)
सर्वर
च्या कमतरतेमुळे आणि संच मान्यता त्वरित करावयाची असल्याने स्कूल पोर्टल तात्पुरते
बंद करण्यात येत आहे.त्यावर कोणत्याही शाळेचे लॉगिन होणार नाही याची नोंद घ्यावी.
2)
स्कूल
पोर्टल मधील ज्या स्क्रीन संच मान्यता साठी आवश्यक असतात तेवढ्याच स्क्रीन आता
भरावयाच्या आहेत.त्या भरण्यासाठी शाळांनी स्कूल पोर्टल लॉगिन न करता education.maharashtra.gov.in या आपल्या सरल च्या website
वरील
स्कूल या टॅब मधील संच मान्यता पोर्टल च्या टॅब मध्ये लॉगिन करून माहिती भरावयाची
आहे.
3)
संच
मान्यता पोर्टल साठी स्कूल पोर्टलचाच पासवर्ड वापरावा आणि लॉगिन व्हावे.
4)या मध्ये आपल्या शाळेच्या व्यवस्थापन
निहाय स्क्रीन उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
लोकल बॉडीच्या शाळेसाठी 4 स्क्रीन उपलब्ध असतील.
लोकल बॉडीच्या शाळेसाठी 4 स्क्रीन उपलब्ध असतील.
1)Home
2)School Information
3)Student Details
4)Working Teaching Staff
2)School Information
3)Student Details
4)Working Teaching Staff
इतर व्यवस्थापनाच्या असणाऱ्या
शाळेसाठी 7 स्क्रीन उपलब्ध असलेल्या दिसून येतील.
1)Home
2)School Information
3)Student Details
4) Sanctioned Teaching Staff
5) Sanctioned Non-Teaching Staff
6)Working Teaching Staff
7) Working Non-Teaching Staff
2)School Information
3)Student Details
4) Sanctioned Teaching Staff
5) Sanctioned Non-Teaching Staff
6)Working Teaching Staff
7) Working Non-Teaching Staff
वर दिलेल्याच स्क्रीन आपण भरावयाच्या आहेत,याव्यतिरिवक्त कोणतीही माहिती
सध्या आपणास भरावयाची आवश्यकता नाही याची नोंद घ्यावी.एका शाळेची माहिती
भरण्यासाठी 10 मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागत नाही ही बाब लक्षात घ्यावी.
या प्रत्येक स्क्रीन मध्ये काय
काय माहिती भरायची आहे ते थोडक्यात पाहू
1)Home
या टॅब वर काहीही माहिती भरू नये,सदर टॅब वर आपल्या शाळेचे नाव
आणि बेसिक माहिती दिलेली असते
2)School Information :
या टॅब मध्ये शाळेची मागील वर्षी स्कूल पोर्टल
मध्ये भरलेली शाळेची बेसिक डिटेल दाखवण्यात आलेली आहे.यामध्ये
शाळेचे नाव
मॅनेजमेंट
कॅटेगरी
खालचा वर्ग-वरचा वर्ग
शिफ्ट
Existing Teaching Rooms
Night school
रात्रशाळा
शाळेचे माध्यम
मॅनेजमेंट
कॅटेगरी
खालचा वर्ग-वरचा वर्ग
शिफ्ट
Existing Teaching Rooms
Night school
रात्रशाळा
शाळेचे माध्यम
ही माहिती या स्क्रीन वर दिसून
येईल
यामध्ये आपणास Existing
Teaching Rooms ही बाब वगळता कोणतीही माहिती या वर्षी नव्याने भरण्याची सुविधा
उपलब्ध नाही याची नोंद
घ्यावी.
Existing
Teaching Rooms या
माहितीमध्ये आपल्या शाळेत शिकवण्याच्या दृष्टीने किती वर्गखोल्या वापरल्या जातात (Enter
no. Of rooms usd for teaching purpose) त्याबद्दल आकडेवारी भरावयाची आहे.
महत्वाचे :
या
स्क्रीन वरील category,management,medium,shift,night school इत्यादी बेसिक माहितीमध्ये
दुरुस्थी असेल तर ती दुरुस्थी करण्याची सुविधा शिक्षणाधिकारी यांच्या स्कूल
पोर्टलच्या लॉगिन ला
उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.शाळा लॉगिन मधून सदर दुरुस्थी होणार
नाही.शिक्षणाधिकारी यांनी दुरुस्थी करताना स्वतः काळजीपूर्वक काटेकोरपणे तसेच
खात्री करून करावी.सदर दुरुस्थीसाठी शिक्षणाधिकारी जबाबदार असणार आहे हे लक्षात
घ्यावे.मागील वर्षी भरलेली माहिती आणि या वर्षी त्यात बदल झालेली माहिती चा
तुलनात्मक रिपोर्ट उपलब्ध करून दिला जाणार आहे आणि या माहितीचे त्रयस्थ
यंत्रणेकडून क्रॉस पडताळणी केली जाणार आहे.
3)Student Details
या स्क्रीन मध्ये शाळेने भरलेली
student पोर्टलमधील
विद्यार्थी माहिती दिसून येणार आहे.student पोर्टलच्या अंतिम मुदतीनंतर student
पोर्टल
मधील संच मान्यता टॅब मध्ये दिसणारी आकडेवारी या स्क्रीन वर आपोआप दिसेल.संच
मान्यता पोर्टल मधील या स्क्रीन वर कोणत्याही शाळेने काहीही माहिती भरू नये
या स्क्रीन मध्ये सन 2015-16
च्या संच
मान्यतेमधील आपल्या शाळेला sanction झालेले शिक्षक कर्मचारी संख्या
दाखवण्यात आलेली आहे.ही स्क्रीन फक्त माहितीसाठी उपलब्ध करून दिलेली आहे,यामध्ये शाळेने काहीही काम
करावयाचे नाही.
5) Sanctioned Non-Teaching Staff
या स्क्रीन मध्ये सन 2012-13
च्या संच
मान्यतेमधील आपल्या शाळेला sanction झालेले नॉन टीचिंग कर्मचारी
संख्या दाखवण्यात आलेली आहे.ही स्क्रीनदेखील फक्त माहितीसाठी उपलब्ध करून दिलेली
आहे,यामध्ये
शाळेने काहीही काम करावयाचे नाही.
6)Working Teaching Staff
या स्क्रीन मध्ये आपणास 1 ऑक्टोबर 2016 या दिवशी आपल्या शाळेत असणारे
कार्यरत शिक्षक कर्मचारी संख्या भरावयाची आहे.ही माहिती भरताना आपणास माध्यमनिहाय
भरायची आहे.या वर्षी माध्यमनिहाय संच मान्यता होणार असल्याने ही कर्मचारी संख्या
माध्यम निहाय भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.मागील वर्षी भरलेल्या एकूण
कार्यरत शिक्षक कर्मचारी च्या माहितीसोबत या वर्षी माध्यमनिहाय शिक्षक माहिती
भरताना सदर आकडेवारी जुळवली जाणार आहे हे लक्षात घ्यावे.माहिती भरताना शाळेच्या
प्रकारानुसार माहिती भरायची सुविधा उपलब्ध आहे. म्हणजेच अनुदानित,विनानुदानीत,कायम विनानुदानित,सेल्फ फायनान्स अशा वेगवेगळ्या
प्रकारानुसार कर्मचारी माहिती येथे भरता येणार आहे.
7) Working Non-Teaching Staff :
या स्क्रीन मध्ये आपणास कार्यरत नॉन टीचिंग स्टाफ ची माहिती भरायची आहे.
अशा प्रकारे लोकल बॉडी च्या शाळेंना 2 स्क्रीन आणि इतर शाळांना
जास्तीत जास्त 3 स्क्रीन
मध्ये माहिती भरावयाची आहे.
महत्वाचे : मल्टीपल ऐडेड आणि पार्सिअली
ऐडेड शाळांनी पुढील सूचना येईपर्यंत संचा मान्यता पोर्टल मध्ये माहिती भरू नये अशा
सूचना देण्यात आलेल्या आहेत.
सदर माहिती भरून finalized करावी आणि दिलेल्या अंतिम मुदतीत क्लस्टर लॉगिन मधून देखील सदर माहिती finalized होणे अपेक्षित आहे याची नोंद घ्यावी.
सदर माहिती भरून finalized करावी आणि दिलेल्या अंतिम मुदतीत क्लस्टर लॉगिन मधून देखील सदर माहिती finalized होणे अपेक्षित आहे याची नोंद घ्यावी.
संच मान्यता माहिती भरण्याच्या मुदतीचे
वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे
विभाग मुदत
पुणे,मुंबई,नागपूर विभाग दिनांक 7/10/2016
ते 10/10/2016
औरंगाबाद,नाशिक विभाग दिनांक 11/10/2016
ते 14/10/2016
कोल्हापूर,लातूर,अमरावती विभाग दिनांक 15/10/2017 ते 18/10/2016
वरील मुदत ही अंतिम आहे,या मुदतीत जी माहिती शाळेने
भरलेली आहे ती अंतिम समजून शाळेची संच मान्यता केली जाणार आहे याची नोंद
घ्यावी.शिक्षणाधिकारी,गटशिक्षणाधिकारी
यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व 100% शाळांची माहिती भरली जाईल आणि
क्लस्टर द्वारे finalized केली जाईल याची काळजी घ्यावी.
महत्वाचे : ज्या शाळांनी या आधी स्कूल
पोर्टल मध्ये संपूर्ण काम केलेले आहे म्हणजेच संच मान्यता मधील वरील स्क्रीन स्कूल
पोर्टल मधून भरलेल्या आहेत आणि finalized केलेल्या आहेत अशा शाळांनी संच
मान्यतामध्ये काम करण्याची गरज नाही आहे,त्या सर्व स्क्रीन संच मान्यता
पोर्टल ला finalized केलेल्या पहायला मिळतील.अशा शाळांनी संच मान्यता पोर्टल open करून फक्त माहिती चेक करून
घ्यावी.