Student पोर्टल मध्ये आधार माहिती भरणे बाबत......
सन २०१५-१६ या वर्षी विद्यार्थ्यांची माहिती सरल student
पोर्टल मध्ये भरताना आपण प्रत्येक विद्यार्थ्यांचे आधार नंबर
भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली होती.भरलेल्या आधार माहिती पैकी काही प्रमाणात
विद्यार्थी आधार माहिती योग्य होती परंतु माहिती भरताना झालेल्या चुकांमुळे बऱ्याच
मोठ्या प्रमाणात ही माहिती UID department कडून invalid
असल्याचे कळवण्यात आलेले आहे.तसेच काही मुलांची आधार माहिती जी
शाळेने भरली नव्हती अशी आकडेवारी देखील मोठ्या प्रमाणात असल्याचे लक्षात आलेले
आहे.या बाबींचा विचार करून पुन्हा या वर्षी मागील वर्षीची invalid माहिती आणि न भरलेली विध्यार्थी आधार माहिती ही नव्याने भरण्याची सुविधा offline
पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.ती माहिती कशा प्रकारे
भरावी यासाठी खाली दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करावा.
सर्वप्रथम मुख्याध्यापकाने आपले login करावे
आणि excel या बटनावर क्लिक करावे.यात असलेल्या Download
UID या बटनावर क्लिक करावे.
Download UID या बटनावर क्लिक केल्यावर आपणास खालील
स्क्रीन दिसून येईल.
यानंतर standard च्या समोर असलेल्या dropdown लिस्ट मधून आपणास ज्या वर्गाच्या मुलांची माहिती download करावयाची आहे त्या वर्गाला निवडून घ्यावे.
तसेच ११ वी आणि १२ वी या वर्गासाठी समोर असलेल्या stream
या बटनामधील dropdown लिस्ट मधून आपणास हवी
असलेली stream म्हणजेच शाखा निवडून घ्यावी.
यानंतर Download या बटनावर क्लिक करावे.Download या बटनावर क्लिक केल्यावर आपणास एक excel file आपल्या
कॉम्पुटर मध्ये download झालेली दिसेल. Download झालेल्या माहितीची file ही excel format मध्ये आपणास खालील प्रमाणे दिसून येईल.
या
excel file मध्ये प्रामुख्याने दोन भाग केलेले
असल्याचे आपल्या लक्षात येईल.
भाग
१ (गुलाबी रंगात असलेली माहिती तथा A पासून
ते I या कॉलम पर्यंतची माहिती) :
मागील वर्षी भरलेल्या पण आधार नंबर चुकीचा भरला असल्याची
यादी आणि ज्या विद्यार्थ्यांची आधार माहिती भरलेली नव्हती अशा विद्यार्थ्यांच्या
नावासह त्या त्या वर्गाची यादी दिसून येईल.
सदर
यादीमध्ये मागील वर्षी आधार नंबर भरलेली आणि UID department कडून valid म्हणून घोषित करण्यात आलेल्या
विद्यार्थ्यांच्या नावांचा समावेश या excel file मध्ये असणार
नाही त्यामुळे या यादीत आपल्या शाळेच्या मागील वर्षीच्या पटापेक्षा या यादीतील
विद्यार्थी संख्या ही कमी देखील असू शकतात याची नोंद घ्यावी. तसेच या भागात आपणास
कोणताही बदल करता येणार नाही हे लक्षात घ्यावे.
ब) भाग २ :
(आकाशी रंगात असलेली माहिती तथा J पासून ते O या कॉलम पर्यंतची माहिती) :
वरील प्रमाणे
असलेल्या यादीमध्ये आकाशी रंगाच्या म्हणजेच J पासून ते O या कॉलम पर्यंतच्या भागामध्ये आपणास या
वर्षीची आधार माहिती इयत्तानिहाय तसेच तुकडीनिहाय वेगवेगळ्या excel file
download करून भरावयाची आहे.
यानंतर J
या संपूर्ण कॉलम ला J या अक्षरावर क्लिक करून select
करून घ्या आणि right क्लिक करा व आलेल्या option
मधून format cell या option वर क्लिक करा.
format
cells या option वर क्लिक केल्यावर आपणास
खालील प्रमाणे option दिसून येतील.या मधील Number या tab ला क्लिक करून त्यामधील Text या option ला क्लिक करा आणि खाली असलेल्या ok
या बटनाला क्लिक करा.म्हणजे आपल्या excel file मधील J या कॉलम मध्ये आता योग्य तो बदल झालेला
असेल.अभ्यासासाठी खालील स्क्रीन पहा.
पुढील स्क्रीन चे निरीक्षण करून खालील माहिती वाचा.
पुढे
दिलेल्या कॉलम मध्ये काय माहिती भरावे हे समजून घ्या.
J
कॉलम : या कॉलम मध्ये विद्यार्थ्यांचा आधार नंबर भरावा.विद्यार्थ्याचा आधार
नंबर उपलब्ध नसेल तर आधार नंबर आणि इतर माहिती भरू नये.तसेच विद्यार्थ्यांचा आधार
नंबर ऐवजी आधार नोंदणी क्रमांक भरू नये.
K
कॉलम : या कॉलम मध्ये विध्यार्थ्याचे पहिले नाव लिहावे.हे लिहित असताना
आपणासमोर विद्यार्थ्याचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे.कारण आधार कार्ड वर जसे नाव
असेल अगदी तसेच नाव (जरी ते चुकीचे असेल तरीही) लिहावे.नाव चुकीचे असेल तर ते
दुरुस्थ करण्याचा प्रयत्न करू नये.अन्यथा UID department कडून सदर विद्यार्थ्यांची माहिती invalid म्हणून परत
करण्यात येईल याची नोंद घ्यावी.ते नाव दुसृस्थ करण्याची बाब ही स्वतंत्रपणे वेगळी
आहे त्याचा सध्या आपण विचार करू नये.ही संपूर्ण सुचना L,M,N आणि
O या कॉलम साठी देखील लागू असेल याची नोंद घ्यावी.याचाच अर्थ
असा की आधार बाबत माहिती भरताना आधार कार्ड वरील माहिती आपणास जशीच्या तशी
भरावयाची आहे, त्यात बदल करू नये. तसेच विद्यार्थी लिंग (Gender)
मध्ये देखील चूक झालेली असेल म्हणजेच विद्यार्थी हा male असेल आणि आधार कार्ड वर female झाले असेल तर आपण ते
आपल्या आधार माहिती भरत असताना excel file मध्ये female
असेच लिहावे.कोणताही बदल करू नये.
L
कॉलम : या कॉलम मध्ये विद्यार्थ्याचे मधले नाव लिहावे.
M
कॉलम : या कॉलम मध्ये विद्यार्थ्याचे शेवटचे नाव लिहावे.
N
कॉलम : या कॉलम मध्ये विद्यार्थ्याची जन्म तारीख लिहावी.जर आधार कार्ड वर
जन्मतारीख संपूर्ण उपलब्ध नसेल म्हणजेच महिना आणि वर्ष (उदा. जून २००९) असे असेल
तर आपण माहिती भरताना जन्म तारीख भरू नये.तसेच जन्म तारीख आपल्या रेकॉर्ड प्रमाणे
आधार कार्ड वर वेगळी असेल म्हणजेच चुकीची असेल तरीही आधार कार्ड वरीलच चुकीची असली
तरीही ती चुकीचीच जन्म तारीख लिहावी.त्यात बदल करू नये.
O
कॉलम : या कॉलम मध्ये विद्यार्थ्याचे लिंग म्हणजेच Gender
लिहावे.आधार कार्ड वर जे लिंग नमूद केले असेल अगदी तेच या ठिकाणी
नमूद करावे.
इतर
सूचना :
अ)
एखाद्या मुलाची आधार माहिती आपणाकडे उपलब्ध नसेल तर आपण त्या विद्यार्थ्याची
कोणतीही माहिती भरू नये.त्या मध्ये NIL असे शब्द किंवा (-) असे कोणतेही चिन्ह भरू नये,अन्यथा
आपली माहिती system कडून स्वीकारली जाणार नाही.
ब)
एकदा माहिती upload केली आणि त्यानंतर जर विद्यार्थ्याचा आधार नंबर
उपलब्ध झाला तर पुन्हा नव्याने सर्व प्रोसेस करावी आणि त्या राहिलेल्या मुलांचे
आधार नंबर system ला update करावेत.
क)आधार
माहिती भरत असताना आपण मुलाकडून आधार कार्ड ची copy मागवून घ्यावी जेणेकरून माहिती भरताना चुका होणार नाही.
ड)
आपल्या शाळेतील सर्व मुलांची आधार माहिती भरावयाची आहे.ज्या मुलांचे आधार नंबर
अद्याप काढलेले नाही अशा सर्व मुलांच्या पालकांना प्रबोधन करून याबाबत महत्व पटवून
द्यावे.
अशा
प्रकारे माहिती भरून झाल्यावर ही माहिती खाली स्क्रीन मध्ये दाखवल्याप्रमाणे office
button या कोपऱ्यात असलेल्या बटनावर क्लिक करावे आणि save
as हा option निवडून त्यापुढे आलेला other
formats या बटनाला क्लिक करावे.अभ्यासाठी पुढील स्क्रीन पहा.
other
formats वर क्लीक केल्यावर file save as होण्यासाठी
आपणास file चे नाव आणि save as type विचारला
जाईल.यामध्ये file च्या नावात कोणताही बदल करू नये.तसेच save
as type मध्ये मात्र Excel Workbook (*.xlsx) हा
type आपणास दिसेल त्यावर क्लिक करून आपण csv
(comma delimited) (*.csv) हा type select करावे.
आता आपल्या file चा type बदललेला असेल.
महत्वाची
सुचना : एकदा आपली file ही csv (comma delimited) (*.csv) या type मध्ये save झाली की या
file ला कोणत्याही कारणास्तव पुन्हा open करून पाहू नये.आपण open करून पाहिल्यास आपल्या file
चा type हा बदलू शकतो आणि त्यानंतर मात्र आपली
माहिती ही system कडून स्वीकारली जात नाही,याची नोंद घ्यावी.
आता पुन्हा मुख्याध्यापकाने आपले login करावे आणि excel या बटनावर क्लिक करावे.यात असलेल्या
Upload UID या बटनावर क्लिक करावे.
Upload UID या बटनावर क्लिक केल्यावर पुढील प्रमाणे
स्क्रीन आपणास दिसून येईल.यामध्ये browse या बटनावर करावे.
यानंतर आताच save as केलेया csv file ला जी
आपल्या शाळेच्या udise ने save असेल
त्या file चा पाथ निवडा आणि open वर
क्लिक करा.
आता
आपण upload या बटनावर क्लिक करा. आपण upload केलेल्या file मध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत error
असेल अशा विद्यार्थ्यांच्या सरल student id चा
उल्लेख करून आपली काय माहिती चुकली आहे हे सविस्तर त्याच page वर system कडून सांगितले जाते .तसेच जेवढ्या
विद्यार्थ्यांची माहिती योग्य प्रकारे भरलेली आहे अशा विद्यार्थ्यांची आकडेवारी
देखील दाखवली जाते. अभ्यासासाठी खालील स्क्रीन पहा.
योग्य माहिती असलेले विद्यार्थी system ने
स्वीकारले की नाही हे पहाण्यासाठी file upload केल्यानंतर 24
तासाने म्हणजेच दुसऱ्या दिवशी सदर विद्यार्थी माहिती HM
login मध्ये reoprt या tab ला क्लिक करून HM लेवल मध्ये UID या OPTION वर क्लिक करून आपणास ज्या मुलांचे आधार
नंबर system ने स्वीकारले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचे
इयत्ता निहाय आधार नंबर माहिती उपलब्ध होते. अभ्यासासाठी पुढील काही स्क्रीन पहा.
यासाठी
Report Tabआ क्लीक करा व त्यामधील Hm लेवल ला क्लीक करून Uid Details या subtab ला क्लीक करा.त्यानंतर आपणास खाली स्क्रीन दिसून येईल.
आपणास ज्या इयत्तेच्या आधार माहितीचा रिपोर्ट पाहावयाचा असेल ती
इयत्ता सिलेक्ट करा.
इयत्ता सिलेक्ट केल्यावर आपणास खालील स्क्रीन दिसून येईल.
अशा प्रकारे आपण आपल्या वर्गातील आधार माहिती भरलेल्या व न भरलेल्या
मुलांची माहिती पाहू शकतो.