MDM पोर्टल संदर्भात सुचना
दिनांक : २६/०३/२०१७
⏩ सर्वांना
सूचित करण्यात येत आहे की,दिनांक ३१ जानेवारी २०१७ ला शालेय पोषण आहार माहिती भरण्यासाठी वरिष्ठ
स्तरावरून नवीन अँड्रॉइड मोबाईल अँप उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.अँप द्वारे
माहिती भरणाऱ्या सर्व user ला या नवीन अँप द्वारेच माहिती
पाठवण्यासंदर्भात या आधी सूचना दिल्या गेलेल्या आहेत.परंतु अद्यापही 23 हजार शाळा जुन्या अँप द्वारेच माहिती भरत आहे.परंतु काही तांत्रिक
अडचणीमुळे आता या जुन्या अँप द्वारे पाठवलेली माहिती ही उद्यापासून म्हणजेच दिनांक
२७/०३/२०१७ पासून सिस्टिम कडून स्वीकारली जाणार नाही.तरी अद्यापही जुन्या
अँप द्वारे माहिती भरणाऱ्या सर्व शाळांना सूचित करण्यात येत आहे की आपण त्वरित
जुने अँप uninstall करावे व नवीन अँप इन्स्टॉल करून
घ्यावे.नवीन अँप डाउनलोड करण्यासाठी आपल्या शाळेच्या MDM पोर्टलच्या
लॉगिन मध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.तसेच खाली दिलेल्या लिंक वर
क्लीक करून आपण आमच्या ब्लॉग ला उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधेमधून देखील
नवीन अँप डाउनलोड करून घेऊ शकाल.यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.