दिनांक : ०८/०४/२०१७
स्टाफ
पोर्टल मध्ये भरलेल्या माहितीच्या आधारे जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली होणार
असल्याच्या सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या असल्याने जि.प. च्या सर्व
शिक्षकांना सूचना देण्यात येत आहे की त्यांना आपली माहिती स्टाफ पोर्टल मध्ये
भरण्यासाठी लवकरच स्टाफ पोर्टल सुरु करण्यात येणार आहे.स्टाफ पोर्टल सुरु
झाल्यानंतर ज्यांची माहिती भरावयाची राहिलेली आहे अशा सर्व शिक्षकांनी आपली माहिती
भरावयाची आहे,तसेच ज्या शिक्षकांनी यापूर्वी भरलेल्या आपल्या माहितीमध्ये काही बदल,दुरुस्थी असेल तर ती माहिती अपडेट करून घ्यायची आहे.यापूर्वी स्टाफ पोर्टल
मध्ये माहिती भरलेल्या शिक्षकांची इतर शाळेत बदली झालेली असेल तर अशा शिक्षकांची
मागील शाळेत भरलेली माहिती नविन शाळेत ट्रान्सफर करण्याची सुविधा देखील देण्यात
येणार आहे,अशा बदली झालेल्या शिक्षकांनी नविन शाळेत आपली
माहिती नव्याने भरू नये,याची नोंद घ्यावी.सदर माहिती
भरण्यासाठी जिल्हा परिषद च्या सर्व शाळांसाठी स्टाफ पोर्टल अद्याप सुरु करण्यात
आलेले नसून ते लवकरच सुरू करण्यात येणार आहे,तशा सूचना आपणास
त्या त्या योग्य वेळी देण्यात येतील.तरी सध्या जिल्हा परिषदेच्या कोणत्याही
शाळांनी आपले Login करण्याचा प्रयत्न करू नये अशा सूचना सदर
पोस्ट द्वारे देण्यात येत आहे.
तसेच अंशतः अनुदानास पात्र असणाऱ्या घोषित शाळांसाठी शिक्षकांची
माहिती स्टाफ पोर्टल मध्ये भरण्याची सुविधा सध्या देण्यात आलेली असून ही सुविधा
लवकरच बंद करण्यात येणार असल्याने अशा अंशतः अनुदानित घोषित शाळांनी आपल्या
शिक्षकांची माहिती त्वरित भरून पूर्ण करावी.इतर शाळांना ही सुविधा देण्यात आलेली
नसल्याने त्यांनी आपले लॉगिन करण्याचा प्रयत्न करून नये.
आंतरजिल्हा
व जिल्हा अंतर्गत बदली विषयी अपडेटेड व अचूक माहितीसाठी आपल्या pradeepbhosale.blogspot.in या
ब्लॉगमध्ये Teacher Transfer या Tab मध्ये Interdistrict
व Intradistrict अशा दोन टॅब उपलब्ध करून
देण्यात आलेल्या आहेत.