महत्वाचे

सुचना

Pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.            .......

उपस्थिती App

                                                          Design & Developed By NIC, Pune


आपल्या Mobile मध्ये उपस्थिती अँड्रॉइड App सुरु करण्यापूर्वी वरील दोन्ही क्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.यासाठी आपण आता या दोन्ही क्रिया समजून घेऊ.
१)         Student पोर्टल मध्ये वर्गशिक्षकाची नोंद करणे.
     शाळेतील प्रत्येक वर्गाचा वर्गशिक्षक आपले उपस्थिती अँड्रॉइड App वापरून आपल्या वर्गातील मुलांची उपस्थिती नोंदवणार आहे.यासाठी student पोर्टल मध्ये त्या त्या वर्गाला त्या त्या वर्गाच्या शिक्षकाची नोंद होणे गरजेचे आहे.म्हणजेच प्रत्येक वर्गशिक्षकाची नोंद आपणास student पोर्टल मध्ये घ्यायची आहे.ती नोंद कशी घ्यावी हे आता समजून घेऊ.
    
    सर्वप्रथम  मुख्याध्यापकाने Student पोर्टलला Login करावे.Login करताना आपणास खालील स्क्रीन दिसून येईल

     या स्क्रीन वर मुख्याध्यापकाने आपल्या शाळेचा Udise क्रमांक आणि Password नोंदवून नेहमीप्रमाणे Login करावे.
    
      यानंतर Maintenance  या Tab मधील Create Teacher User या बटनावर क्लिक करावे.समजून घेण्यासाठी खालील स्क्रीन पहावी.

       वरील स्क्रीन मध्ये दाखवल्याप्रमाणे Maintenance  या Tab मधील Create Teacher User या बटनावर क्लिक केल्यावर आपणास खालील स्क्रीन दिसून येईल. या फॉर्म मध्ये नवीन शिक्षकाची माहिती भरून त्या शिक्षकाची student पोर्टल मध्ये नोंद करता येते. समजून घेण्यासाठी खालील स्क्रीन पहावी.

वरील स्क्रीन मध्ये ज्या वर्ग शिक्षकांची आपणास Student पोर्टल मध्ये नोंद करावयाची आहे त्या शिक्षकांची माहिती भरावी.ही माहिती भरत असताना त्या शिक्षकाचे नाव आणि त्यांचा Mobile क्रमांक ज्या क्रमांकावर आपण उपस्थिती app वापरणार आहोत तो नमूद करणे आवश्यक आहे.इतर माहिती जी आपणास भरणे शक्य आहे ती भरावी.
     या फॉर्म मध्ये माहिती कशा प्रकारे भरणे आवश्यक आहे ते खालील स्क्रीन मध्ये


     वरील प्रकारे माहिती भरून झाल्यावर शेवटी असलेल्या Register या बटनावर क्लिक करावे आणि त्या शिक्षकाला Student पोर्टल मध्ये वर्गशिक्षक म्हणून नोंदवून घ्यावे. त्यानंतर सदर शिक्षक हा वर्गशिक्षक म्हणून खाली दिलेल्या वर्गशिक्षकांच्या यादीमध्ये दिसून येईल हे लक्षात घ्यावे. समजून घेण्यासाठी खालील स्क्रीन पहावी.


  

     वरील यादीमध्ये आपण Pradeep Bhosle या शिक्षकाची वर्गशिक्षक म्हणून नोंद झाल्याचे आपणास दिसत आहे.अशा प्रकारे कोणत्याही वर्ग शिक्षकांची नोंद आपण Student पोर्टल मध्ये घेऊ शकतो.यानंतर या वर्ग शिक्षकास तो ज्या वर्गाला/तुकडीला वर्गशिक्षक म्हणून कार्यरत आहे त्या वर्गाला/तुकडीला Assign करणे गरजेचे आहे.ते कसे Assign करावे हे आता आपण सविस्तररीत्या पाहू.

१)          वर्गशिक्षक ज्या इयत्तेला शिकवत आहे त्या इयत्तेला/तुकडीला Assign करणे.
      Student पोर्टल मध्ये कोणत्याही शिक्षकास एका/एका पेक्षा अधिक  वर्गास/तुकडीला Assign करण्यासाठी मुख्याध्यापकाने सर्वप्रथम Master या Tab ला क्लिक करावे आणि त्यामध्ये दिसून येणाऱ्या Assign classteacher या बटनाला क्लिक करावे.समजून घेण्यासाठी आपण खालील स्क्रीन पहावी.

     Master या Tab मधील Assign classteacher या बटनाला क्लिक केल्यावर आपणास खालील स्क्रीन दिसून येईल.

        वरील स्क्रीन मध्ये दिसून येणारा फॉर्म संपूर्ण पणे भरून घ्यावा. स्क्रीन मध्ये ज्या वर्गासाठी व तुकडीसाठी शिक्षक Assign करावयाचे आहेत त्या वर्गाला,तुकडीला निवडून घेउन त्या शिक्षकाचे नाव Select करावे.ही माहिती भरत असताना स्क्रीन मध्ये ज्या वर्गासाठी व तुकडीसाठी शिक्षक Assign करावयाचे आहेत त्या वर्गाला,तुकडीला निवडून घेउन त्या शिक्षकाचे नाव Select करावे.
    
    अशा प्रकारे एखादा शिक्षक एक किंवा एकापेक्षा अधिक वर्गाला Student Portal मध्ये वर्ग शिक्षक म्हणून नोंद करून घ्यायचा आहे.




         वरील स्क्रीन प्रमाणे ज्या वर्गासाठी व तुकडीसाठी शिक्षक Assign करावयाचे आहेत त्या वर्गाला,तुकडीला निवडून घेउन त्या शिक्षकाचे नाव Select केल्यावर  Assign या बटनावर क्लिक केले करावे.त्यानंतर खाली दिसत असलेल्या शिक्षकाच्या यादीमध्ये सदर शिक्षक त्या वर्गाला Assign झालेला दिसून येईल,म्हणजेच ज्या वर्गासाठी व तुकडीसाठी शिक्षक Assign करावयाचे आहेत त्या वर्गाला,तुकडीला निवडून घेउन त्या शिक्षकाचे नाव select केल्यावर  Assign या बटनावर क्लिक करावे.त्यानंतर खाली दिसत असलेल्या शिक्षकाच्या यादीमध्ये सदर शिक्षक त्या वर्गाला Assign झालेला दिसून येईल. समजून घेण्यासाठी खालील स्क्रीन पहावी.

      वरील स्क्रीन मध्ये आपण Pradeep Bhosle या वर्ग शिक्षकाची नोंद ही इयत्ता २ री ला assign झालेली दिसून येईल.
    एका शिक्षकाकडे एका पेक्षा अधिक वर्गासाठी वर्गशिक्षक म्हणून कार्यभार असेल तर वर दिलेल्या माहितीनुसार त्या शिक्षकास त्या त्या वर्गाला Assign करून घ्यावे.म्हणजे उपस्थिती App मध्ये हजेरी  भरताना त्या शिक्षकाला ते ते वर्ग व विद्यार्थी दिसून येतील.
     अशा प्रकारे उपस्थिती App आपल्या Mobile मध्ये Install करण्यापूर्वी Student पोर्टल मध्ये करावयाची कार्यवाही आपण समजावून घेतलेली आहे.आता आपण प्रत्यक्ष उपस्थिती app बाबत माहिती घेणार आहोत.


      उपस्थिती App आपल्या Mobile मध्ये Install करण्यासाठी आपण आपल्या Android Mobile मधून student पोर्टल मध्ये login करावे.यानंतर Attendance App या Tab ला क्लिक करावे.या Tab ला क्लिक केल्यावर आपणास खालील स्क्रीन दिसून येईल.

      वरील स्क्रीन मध्ये खालच्या बाजूला शेवटी असलेल्या Download App या बटनावर क्लिक करावे.या बटनावर क्लिक केल्यावर आपल्या Mobile मध्ये उपस्थिती App Download होईल. उपस्थिती App Download झाल्यावर या App ला आपल्या Mobile मध्ये Install करावे.

Install करताना आपणास खालील प्रमाणे स्क्रीन दिसून येईल.


       वरील स्क्रीन वर खालच्या बाजूला असलेल्या Install या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर उपस्थिती app Install होईल.App Install होण्यासाठी साधारणपणे १० ते २० सेकंद एवढा कालावधी लागू शकतो.तोपर्यंत वात पहावी.हे App Install झाल्यावर Mobile स्क्रीन वर आपणास खालील प्रमाणे Alert दिसून येईल.

वरील स्क्रीन वरील Done या बटनावर क्लिक करा.

    हे App आपल्या Mobile मध्ये Install झाल्यावर Mobile च्या स्क्रीन वर खालीलप्रमाणे एक Icon दिसून येईल.


      वरील Mobile स्क्रीन वर दिसत असलेल्या उपस्थिती App च्या बटनावर क्लिक करावे.यानंतर आपल्या Mobile वर खालील प्रमाणे उपस्थिती App हे open झालेले दिसेल.उपस्थिती App हे Open झाले की सर्वप्रथम आपणास खालीलप्रमाणे पहिली स्क्रीन दिसेल.


     वरील स्क्रीन मधील CLICK HERE TO BEGIN WITH ATTENDANCE या बटनावर क्लिक करावे.त्यानंतर लगेचच आपणास पुढील स्क्रीन दिसेल.


       वरील स्क्रीन मध्ये दिसत असलेल्या पहिल्या रकान्यात आपल्या शाळेचा Udise क्रमांक भरावा आणि त्यानंतरच्या रकान्यात Student पोर्टल मध्ये आपण रजिस्टर केलेला Mobile क्रमांक भरावा.
    रजिस्टर केलेल्या Mobile क्रमांकाव्यतीरीक्त नंबर नमूद केल्यास आपले रजिस्ट्रेशन यशस्वीपणे पूर्ण होणार नाही हे लक्षात घ्यावे.
   Udise क्रमांक व Student पोर्टल मध्ये आपण रजिस्टर केलेला Mobile क्रमांक नमूद केल्यावर शेवटी असलेले Register या बटन दाबावे.
    Register हे बटन दाबल्यावर आपल्या Mobile वर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरु होईल.हे रजिस्ट्रेशन होत असताना सर्वप्रथम आपल्या रजिस्टर Mobile क्रमांकावर (तो नंबर कोणत्याही Mobile मध्ये असला तरी चालेल) एक System कडून जनरेट झालेला OTP (One Time Password) Text  मेसेज द्वारे पाठवला जातो. जेंव्हा हा OTP system कडून आपल्या  रजिस्टर Mobile क्रमांकावर पाठवला जातो त्यानंतर लगेचच आपल्या App स्क्रीन वर खालील प्रमाणे स्क्रीन दिसून येईल.

      म्हणजेच याचा अर्थ असा आहे की,System कडून तयार करण्यात आलेला OTP आपल्या Mobile क्रमांकावर पाठवण्यात आलेला आहे.हा OTP आपल्या  Mobile मधील मेसेजच्या Inbox  मधून मिळवावा आणि  OTP च्या रकान्यात नमूद करून Confirm OTP  या बटनावर क्लिक करा.समजून घेण्यासाठी पुढील स्क्रीन पहावी.

     वरील स्क्रीनप्रमाणे OTP नमूद करा आणि Confirm OTP   हे बटन दाबा.यानंतर आपल्या Mobile वर लगेचच Registration Successful मेसेज येईल.

           अशा प्रकारचा Alert आला की आपला Handset आणि Mobile क्रमांक आपण नमूद केलेल्या Udise साठी Registration झाले आहे असे समजावे.ही प्रक्रिया फक्त एकदाच होते.यानंतर आपण हे App याच क्रमांकासाठी आणि Handset साठी वापर करू शकणार आहात.जर आपला Handset बदल झाला तर आपणास Student पोर्टल मध्ये Attendance App  या Tab मधील Unregister Teacher या बटनावर क्लिक करून सदर शिक्षकास  Unregister करून घ्यावे लागेल आणि त्यानंतर  दुसऱ्या Handset ला पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करावे लागेल.तसेच आपला mobile क्रमांक बदल झाल्यास आपला Mobile क्रमांक Student पोर्टल मध्ये Update करून घ्यावा लागेल.त्याशिवाय आपले नव्याने रजिस्ट्रेशन होणार नाही.
   अशा प्रकारे आपण एकदा उपस्थिती App मध्ये Registration झालात की आपणास पुढील प्रकारे कार्यवाही करावयाची आहे.ही कार्यवाही आता समजून घेऊ.
   Registration झाल्यावर आपल्या Mobile वर सर्वप्रथम पुढील स्क्रीन दिसेल.



      वरील स्क्रीन मध्ये आपणास चार Tab दिसून येत आहे.या चार Ttab चे कार्य थोडक्यात समजावून घेऊ.
१) SUBMIT ATTENDANCE : प्रत्येक दिवशी विद्यार्थी उपस्थिती नोंदवण्यासाठी,म्हणजेच शाळेतील अनुपस्थित विद्यार्थी  नोंद घेण्यासाठी.
२) VIEW ATTENDANCE GREPORT: नोंदवलेल्या दैनदिन उपस्थितीचा रिपोर्ट पहाण्यासाठी.
३)  SUBMIT ATTENDANCE WITH SELFIE: सेल्फी काढून उपस्थीती नोंदण्यासाठी.
४)     VIEW SELFIE ATTENDANCE REPORT: नोंदवलेल्या सेल्फी उपस्थितीचा रिपोर्ट पहाण्यासाठी.

    अशा प्रकारे या चार Tab चे कार्य आहे हे लक्षात घ्यावे. या ठिकाणी एक बाब लक्षात घ्यावी की,आपणास उपस्थिती आणि सेल्फी अशा दोन वेगवेगळ्या प्रकारे उपस्थिती नोंद करावयाची आहे.शासनाच्या आदेशानुसार आपण सोमावारी सेल्फी द्वारे आणि इतर दिवशी उपस्थिती द्वारे विद्यार्थी हजेरी नोंद घेणार आहोत.त्यामुळे आता या दोन्ही वेगवेगळ्या प्रकाराच्या हजेरी ची  सविस्तर माहिती घेऊ. सेल्फीसह उपस्थिती 




उपस्थिती

     उपस्थिती द्वारे हजेरी नोंदवताना सर्वप्रथम आपण दुसऱ्या क्रमांकाच्या Tab  ला क्लिक करू.म्हणजेच आपण SUBMIT ATTENDANCE REPORT या बटनाला क्लिक करू.त्यानंतर आपणास खालील स्क्रीन दिसून येईल.

           वरील स्क्रीन मध्ये आपणास आपल्या शाळेचे नाव,इयत्ता आणि तुकडी दिसून येईल.या स्क्रीन मध्ये शेवटी दिसून येत असलेल्या Select Date या नावासमोर दिलेल्या राकान्यावर क्लिक करा.त्यानंतर आपणास एक कॅलेंडर open झालेले दिसेल.त्यावर आपणास ज्या दिवशीची उपस्थिती नोंद करायची आहे तो दिनांक select करावा.दिनांक select केल्यावर आपणास पुढीलप्रमाणे Mark Absent Student अलर्ट असलेली स्क्रीन दिसून येईल.


     वरील स्क्रीन वरून आपणास एक बाब लक्षात आलेली असेल की,Mobile स्क्रीन दिसत असलेल्या सूचनेनुसार आपणास दिसत असलेल्या आपल्या वर्गातील मुलांच्या नावाच्या यादीमधून फक्त आणि फक्त अनुपस्थितीत म्हणजेच गैरहजर (Absent) विद्यार्थी select कारावयाचे  आहे.घाईमध्ये अनुपस्थित विध्यार्थी नोंद करण्याऐवजी उपस्थित विद्यार्थी नोंद करू शकण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी काळजीपूर्वक फक्त आणि फक्त शाळेतील गैरहजर विद्यार्थ्यांच्या नावासमोरच टीक मार्क करावयाची आहे.खालील स्क्रीन मध्ये दाखवल्याप्रमाणे गैरहजर विद्यार्थी समोर सदर विद्यार्थी गैरहजर असल्याबाबत टिक मार्क करा.

      गैरहजर विद्यार्थ्यासमोर टीक मार्क केल्यावर खाली असलेल्या Submit Attendance या बटनावर क्लिक करा.त्यानंतर आपणास स्क्रीन वर पुढील अलर्ट मेसेज आलेला दिसेल.



     वरील अलर्ट मेसेज मध्ये आपणास एकूण विद्यार्थी,उपस्थित विद्यार्थी,गैरहजर विद्यार्थी आणि ज्या दिवशीची उपस्थिती आपण नोंदवत आहोत याबाबात एक Report दाखवलेला दिसेल.हा रिपोर्ट वाचून खात्री करा आणि ok या बटनावर क्लिक करा.त्यानंतर आपणास पुढील स्क्रीन आपल्या Mobile वर दिसून येईल.


वरील सूचनेस मधील  yes ला क्लिक करा.

    अशा प्रकारे आपण आपल्या वर्गाची उपस्थिती यशस्वीरीत्या नोंदवलेली आहे.जर एकाच शिक्षकाकडे एका पेक्षा अधिक वर्ग वर्गशिक्षक म्हणून असेल तर त्या शिक्षकाने वरील स्क्रीन मधील इयत्ता या रकान्यात क्लिक करून आपल्या दुसऱ्या वर्गाला select करा आणि वरीलप्रमाणे विद्यार्थी हजेरी नोंद करा.


   आपण नोंदवलेली विद्यार्थी हजेरी आपणास पुन्हा पहावयाची असेल तर त्यासाठी खालील स्क्रीनवरील क्रमांक १ चे बटन म्हणजेच VIEW ATTENDANCE REPORT वर क्लिक करा.


     वरील स्क्रीन मध्ये दिसत असलेल्या क्रमांक एक च्या tab ला म्हणजेच VIEW ATTENDANCE REPORT यावर क्लिक केल्यावर आपणास खालील स्क्रीन दिसू येईल.


    वरील स्क्रीन वरील ज्या वर्गाचा उपस्थिती report आपणास पाहावयाचा असेल त्या वर्गाला आणि तुकडीला select करा  आणि शेवटी असलेल्या Go या बटनाला क्लिक करा.त्यानंतर आपणास पुढील स्क्रीन दिसून येईल.

    वर दिसत असलेल्या तारखेपैकी  ज्या तारखेचा रिपोर्ट पाहावयाचा असेल त्या report वर क्लिक करा. त्यानंतर आपणास खालील स्क्रीन  दिसून येईल.


वर दिसत असलेल्या स्क्रीन मध्ये उपस्थित विद्यार्थी नावाखाली P या अक्षराने आणि अनुपस्थित विद्यार्थी नावाखाली A या अक्षराने दाखवलेली दिसत आहे.अशा प्रकारे आपण दैनंदिन उपस्थितीची नोंद घेणार आहोत.या दैनदिन उपस्थितीबाबत          
      सविस्तर रिपोर्ट आपल्या student पोर्टल login ला उप्पल्ब्ध करून देण्यात आलेला आहे.त्याबाबत आपण सविस्तर माहिती शेवटी घेणार आहोत.

SELFIE सेल्फी

     सेल्फी या उपस्थिती प्रकारात आपण विद्यार्थ्यांचे फोटो काडून त्या फोटोत असलेल्याच  मुलांची उपस्थितीची नोंद घेणार आहोत.यासाठीची सविस्तर माहिती आपण समजून घेऊया.


          सेल्फीसह उपस्थिती नोंद घेण्यासाठी वरील स्क्रीन मध्ये दाखवल्याप्रमाणे SUBMIT ATTENDANCE WITH SELFIE या बटनावर क्लिक करा.त्यानंतर आपणास वरील दुसऱ्या क्रमांकाची स्क्रीन दिसून येईल.या स्क्रीन वरील इयत्ता,शाखा,तुकडी,आणि ज्या दिवशी सेल्फी सह उपस्थिती नोंद करावयाची असेल ती तारीख नोंदवावी आणि शेवटी असलेल्या Go या बटनावर क्लिक करावे.त्यानंतर आपणास खालील स्क्रीन दिसून येईल.

   वरील स्क्रीन मध्ये आपणास Take Selfie आणि Selfe Gallery अशा दोन tab दिसून येत आहेत.याविषयी थोडक्यात माहिती घेऊ.
१)              Take Selfie: या tab चा वापर करून आपण मुलांचे फोटो घेऊन त्या फोटोत असणाऱ्या विद्यार्थ्यांची उपस्थितीत नोंदवून ती माहिती save करणार आहोत.
२)              Selfe Gallery : वरील Take Selfie या बटनावर क्लिक करून save केलेली माहिती Selfe Gallery  या बटनावर क्लिक करून submit करणार आहोत.
     अशा प्रकारे वरील स्क्रीन मधील Take Selfie या बटनावर क्लिक करा.त्यानंतर आपल्या Mobile चा कॅमेरा open होईल.आता आपण आपल्या कॅमेरा मध्ये वर्ग शिक्षकासह १० मुलांचे ग्रुप करून फोटो घेणार आहोत.आपण फोटो घेतल्यावर काय कृती करावी हे समजून घेण्यासाठी खालील स्क्रीन पहावी.

     वरील स्क्रीन मधील कॅमेराद्वारे फोटो घेण्यानंतर ok या बटनावर क्लिक करावे.ok या बटनावर क्लिक केल्यावर आपणास पुढील स्क्रीन दिसून येईल.


       वरील प्रमाणे आपण घेतलेला फोटो आणि त्याखाली आपल्या वर्गातील मुलांच्या नावांची यादी आपणास दिसून येईल.या फोटोत असलेले विद्यार्थी आपण त्याखालील यादी मध्ये टिक मार्क करणार आहोत.

        फोटोत असलेले विद्यार्थी select केल्यानंतर विद्यार्थी यादी च्या खाली असलेल्या Save Attendance या बटनावर क्लिक करा.समजून घेण्यासाठी पुढील स्क्रीन पहावी.

Save Attendance ला क्लिक केल्यावर आपणास पुढील प्रमाणे Alert मेसेज स्क्रीन वर आलेला दिसून येईल.


       वरील Alert मेसेज ला Ok करा.अशा प्रकारे आपण १० मुलांची सेल्फी सह उपस्थिती Save केलेली आहे.वरील पद्धतीने आपल्या वर्गातील सर्व मुलांची सेल्फी सह उपस्थिती Save करून घ्या.सर्व मुलांची उपस्थिती Save झाली की    मग त्यानंरच सर्वांची Save केलेली उपस्थिती आपण Submit करणार आहोत.मित्रांनो,एक बाब येथे लक्षात घ्या की उपस्थिती असो किंवा सेल्फी सह उपस्थिती असो ही फक्त एका दिवसात एकदाच submit करता येते.त्यामुळे ही उपस्थिती Submit करण्याआधी सर्व मुलांची उपस्थिती आपण घेतलेली आहे किंवा नाही हे काळजीपूर्वक तपासून मगच उपस्थिती Submit करण्याची क्रिया करा.आता Save केलेली सेल्फी सह उपस्थिती कशा प्रकारे Submit करावी याबाबत माहिती घेऊ.

  मुलांची उपस्थिती Save केली की खालील स्क्रीन वरील  Selfe Gallery या Tab ला क्लिक करा.

      Selfe Gallery या tab ला क्लिक केल्यावर आपणास वरील स्क्रीन मधील दुसऱ्या क्रमांकाची स्क्रीन दिसून येईल.समजून घेण्यासाठी खालील स्क्रीन पहावी.

वरील स्क्रीन मध्ये आपण काढलेले सेल्फी आणि त्यासमोर सेल्फी मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दिसून येत आहे.विद्यार्थी संख्येवर क्लिक केल्यास आपणास त्या फोटोत असलेल्या आणि आपण नोंदवलेल्या विद्यार्थ्यांची नावे दिसून येईल.अशा प्रकारे आपण जेवढे सेल्फी घेतलेले असतील तेवढे सेल्फी या स्क्रीन वर दिसून येतील.अभ्यासाठी पुढील स्क्रीन पहावी.

अशा प्रकारे आपण आता ही सेल्फी सह उपस्थिती Submit करणार आहोत.यासाठी वरील स्क्रीन मध्ये दिसून येत असलेल्या Submit Attendance या बटनावर क्लिक करा.त्यानंतर आपणास पुढील Alert मेसेज असणारी स्क्रीन दिसून येईल.

अशा प्रकारे आपण आपली सेल्फी सह उपस्थिती Submit केलेली आहे.

आता आपणास  आजच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपण सेल्फीसह  उपस्थिती Submit केलेली आहे त्या दिवशी एकदा उपस्थिती  Submit केली की पुन्हा नव्याने उपस्थिती  Submit करता येणार नाही.वरील स्क्रीन मध्ये असणारे Submit Attendance चे बटन आपणास तेथे उपलब्ध होणार नाही हे लक्षात घ्यावे.
      आपणास आपण पाठवलेली सेल्फी सह उपस्थिती पहावयाची असेल तर खालील स्क्रीन प्रामाणे कृती करा.

    वरील प्रमाणे VIEW SELFIE ATTENDANCE REPORT या Tab वर क्लिक करा.त्यानंतर आपणास पुढील स्क्रीन दिसून येईल.


    आपणास ज्या वर्गाची,तुकडीची उपस्थिती पहावयाची असेल ती सर्व माहिती Select करा आणि Go या बटनावर क्लिक करा.त्यानंतर आपणास खालील स्क्रीन दिसून येईल.


    वरील स्क्रीन मधील तारखेवर क्लिक केल्यास आपणास पुढील स्क्रीन दिसून येईल.


     वरील स्क्रीन मध्ये आपणास आपण घेतलेले सेल्फी फोटो आणि त्यातील विद्यार्थी दिसून येतील.वरील स्क्रीन मधील विद्यार्थी संख्येवर क्लिक केल्यास आपणास त्या विद्यार्थ्यांचा फोटो आणी त्यातील उपस्थिती नोंद केलेल्या विद्यार्थ्यांची नावे दिसून येतील.समजून घेण्यासाठी खालील स्क्रीन पहावी.


       अशा प्रकारे आपण उपस्थिती आणि सेल्फीसह उपस्थिती या दोन बाबींचा सविस्तर अभ्यास केलेला आहे.मित्रांनो आपण हे app आपल्या Mobile मध्ये Install करून घ्या आणी वर सांगितलेल्या प्रमाणे कृती करून विद्यार्थी हजेरी नोंद करा.


इतर काही सुचना :-
१)              आपण उपस्थिती App Install केले आणि त्यानंतर जर आपल्या शाळेतील विद्यार्थी इतर शाळेत ट्रान्स्फर,Migrate झाला किंवा इतर शाळेतून आपल्या वर्गात आला तर काय करावे ?



    उत्तर : अशा केस मध्ये आपण काहीही करू नये.आपले App आपणास याबाबत सुचना देण्याचे काम करणार आहे.जेंव्हा आपल्या वर्गातून एखादा विद्यार्थी इतर शाळेत ट्रान्स्फर,Migrate झाला किंवा Out Of School झाला असेल किंवा इतर शाळेतून आपल्या वर्गात आला असेल अशा वेळी आपल्या उपस्थिती App च्या स्क्रीन वर खालील मेसेज दिसून येईल.


वरील स्क्रीन वर आलेल्या alert मेसेज ला ok करा आणि त्यानंतर आपणास खालील स्क्रेन दिसून येईल.

    वरील स्क्रीन वरील Refresh Student या बटनावर क्लिक करा.त्यानंतर काही सेकंदातच आपल्या Mobile App मधून सदर विद्यार्थी काढला जाईल किंवा घेतला जाईल. अभ्यासासाठी खालील स्क्रीन पहावी.

   वरील  Alert मेसेज ला Yes करा आणी त्यानंतर आपले Student लिस्ट ही Update होऊन जाईल.


२)              Mobile वर भरलेली उपस्थिती आपणास आपल्या Student पोर्टल च्या Login ला कशी पहावी?

उतर : Mobile वर भरलेली उपस्थिती आपणास आपल्या Student पोर्टल च्या Login ला देखील पहाण्यास मिळणार आहे.यासाठी खालील स्क्रीन पहा.


     वरील स्क्रीन प्रमाणे आपल्या Student पोर्टल Login मध्ये Report tab मध्ये Attendance याSubtab ला क्लिक करून Daily Attendance या बटनाला क्लिक करा त्यानंतर  आपणास पुढील स्क्रीन दिसून येईल.


   या स्क्रीन मध्ये दिसत असलेल्या Date च्या रकान्यात आपणास ज्या दिनांकाची माहिती पहावयाची असेल तो दिनांक Select करा.त्यानंतर आपणास खालील स्क्रीन दिसून येईल.

    अशा प्रकारे आपण उपस्थिती App मधून नोंद केलेल्या विद्यार्थ्यांचा Report आपल्या Student पोर्टल ला देखील पाहू शकाल.

Thank You …..