विद्यार्थी out of school
करणे
मागील वर्षी student
पोर्टलमध्ये नोंद केलेले आपल्या शाळेतील मुले काही कारणास्तव शाळा सोडून गेले आहेत
आणि अशा मुलांना त्या वर्गाच्या पटामधून कमी करणे गरजेचे आहे यासाठी एक नविन
सुविधा म्हणजेच त्या विद्यार्थ्याला out of school करण्याची सुविधा student पोर्टल
मध्ये मुख्याध्यापक login मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.यासाठी खालील
माहिती वाचा.
सर्वप्रथम आपल्या शाळेचे login करावे आणि maintenance tab मधील update
standard data या बटनावर क्लिक करावे.
update
standard data या बटनावर क्लिक केल्यावर आपणास पुढील स्क्रीन दिसून येईल.
या
स्क्रीन वर Make student out of school या
बटनावर क्लिक करा.त्यानंतर आपणास पुढील स्क्रीन दिसून येईल.
वरील स्क्रीन मध्ये
दाखविल्याप्रमाणे Type या tab मधील out of school हा पर्याय निवडावा आणि खाली
दाखविल्याप्रमाणे select reason मध्ये ज्या विद्यार्थ्याला आपण आपल्या शाळेतून
म्हणजेच या वर्षी लागणाऱ्या संच मान्यतेसाठीच्या विद्यार्थी संख्येमधून कमी
करण्यासाठी ज्या कारणामुळे कमी करणार आहोत ते कारण select करावे.
सदर
कारणामध्ये खालील कारणांचा समावेश करण्यात आलेला आहे.
१)
Absent Since Long
Period : असे विद्यार्थी जे बऱ्याच
दिवसापासून शाळेत येत नाही.(कायम गैरहजर)
२)
Couldn’t Continue
Higher Education : उच्च शिक्षण पूर्ण
करू शकला नाही आणि शाळा सोडून गेला आहे असे विद्यार्थी.
३)
Died
: मयत विद्यार्थी.
४)
Don’t Have Higher
Standard And Not Requested For Transfer:
शिक्षणासाठी पुढील वर्ग उपलब्ध नाही आणि इतर शाळेत शिकण्यास गेला नाही किंवा नवीन
शाळेत शिकण्यास गेला आहे पण नविन शाळेची ट्रान्स्फर ची विनंती आलेली नाही असे
विद्यार्थी.
५)
Not Required
Transfer :
विद्यार्थी ट्रान्स्फर ची आवशकता नसलेले विद्यार्थी.
६)
10th
Fail
: १० वी इयत्ता अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी.
७)
12th
Fail
: १२ वी इयत्ता अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी.
८)
12th
pass:
१२ वी उत्तीर्ण असलेले विद्यार्थी.
select reason मध्ये वरील
योग्य कारणाचा पर्याय निवडावा आणि त्या समोर असलेल्या Enter Remark या बटनासमोर असलेल्या रकान्यात शक्य असेल तर शेरा (remark) लिहावा.
यानंतर
आपणास पुढील स्क्रीन उपलब्ध होईल.यामध्ये आपणास ज्या विद्यार्थ्याला कमी करावयाचे
आहे अशा विद्यार्थ्याला शोधावयाचे आहे तो विद्यार्थी शोधण्यासाठी आपण दिलेल्या
कोणत्याही पर्यायाचा वापर करू शकाल.अशा विद्यार्थ्यास शक्य तो त्याच्या standard
निहाय शोधणे योग्य असते.अभ्यासासाठी खालील स्क्रीन चा अभ्यास करा.यामध्ये शैक्षणिक
वर्ष,इयत्ता,शाखा आणि तुकडी या बटनासमोर आपणास लागू असलेला पर्याय निवडा आणि शेवटी
असलेल्या submit बटनावर क्लिक करा.
शेवटी
असलेल्या submit बटनावर क्लिक केल्यावर
आपणास खालील स्क्रीन मध्ये दाखवल्याप्रमाणे विद्यार्थी यादी उपलब्ध होते.
ज्या
विद्यार्थ्याला आपणास कमी करावयाचे आहे अशा विद्यार्थ्यास आपण select करून घ्यावे.
विद्यार्थ्यास select केल्यावर
शेवटी असणाऱ्या submit बटनावर क्लिक करावे.त्यानंतर विद्यार्थी त्या तुकडीमधून out
of school केलेला आहे अशा अर्थाची सुचना पहावयास मिळेल.
म्हणजेच
विद्यार्थ्यास out of school करण्याची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली असे समजावे.आता
सदर विद्यार्थी आपल्या शाळेच्या सन २०१६-१७ च्या catalogue मध्ये दिसून येणार नाही हे लक्षात घ्यावे.
विद्यार्थी
out of school केला म्हणजे system मधून कायमचा delete केलेला आहे असे समजणे चुकीचे
आहे.out of school केलेले विद्यार्थी हे फक्त या वर्षीच्या संचमान्यतेसाठी गृहीत
धरण्यात येणार नाही आहे.असे विद्यार्थी पुन्हा शाळेत आणण्यासाठी शाळेने प्रयत्न
करावयाचे आहेत.तसेच सदर मुलांची यादी ही सर्व login ला दाखवण्यात येणार आहे
महत्वाचे :
चुकून एखादा विद्यार्थी हा out of school झालेला
असेल तर त्या विद्यार्थ्याला पुन्हा त्याच शाळेत घेता येईल.तसेच out of
school केलेले विद्यार्थी
इतर शाळेला ट्रान्सफर साठी उपलब्ध असतील हे लक्षात घ्यावे.
Out Of School केलेला विद्यार्थी
पुन्हा परत घेणे
एखादा
विद्यार्थी चुकून out of school झालेला असेल आणि त्या विद्यार्थ्यास पुन्हा
शाळेच्या student पोर्टल मधील माहितीमध्ये घ्यायचा असेल तर अशा बाबतीत online काम
कसे कारावे याविषयी आता माहिती पाहूया.
सर्वप्रथम
मुख्याध्यापक आपल्या शाळेचे login करतील.त्यानंतर maintenance या tab मधील update
standard data या subtab ला क्लिक करावे.अभ्यासासाठी खालील स्क्रीन पहावी.
update
standard data या tab ला वलिक केल्यावर आपणास खालील स्क्रीन पहावयास मिळेल.
वरील
स्क्रीन मधील undo out of school या बटनाला क्लिक करावे.त्यानंतर आपणास खालील
स्क्रीन पहावयास मिळेल. undo out of school या बटनाला क्लिक केल्यावर आपणास आपण
आतापर्यंत शाळेतील ज्या विद्यार्थ्यांना out of school केलेले आहे त्या सर्व
विद्यार्थ्यांची यादी दाखवली जाईल.
ज्या
विद्यार्थ्यास चुकून out of school केलेले आहे आणि आता त्याला पुन्हा परत घ्यायचे
आहे अशा विद्यार्थ्याच्या नावासमोर असणाऱ्या बटनाला क्लिक करावे.त्यानंतर आपणास
पुढील स्क्रीन पहावयास मिळेल.
वरील
स्क्रीन वर आलेल्या notification ला ok म्हणावे.त्यानंतर आपणास खालील मेसेज दाखवला
जाईल म्हणजेच आपला विद्यार्थी school मध्ये परत घेतलेला आहे असे समजावे.
अशा
प्रकारे कोण्याही out of school केलेल्या मुलास आपण दिलेल्या सुविधेद्वारे पुन्हा
school मध्ये घेऊ शकतो.