महत्वाचे

सुचना

Pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.            .......

Delete Duplicate Student

           
        २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात student पोर्टल ला माहिती भरताना मागील वर्षी भरलेली विद्यार्थी माहिती update करणे गरजेचे होते.त्यासाठी सर्वप्रथम १ ते ८ या वर्गाचे system द्वारे ऑटो प्रमोशन केले गेले आणि ९ ते ११ वीच्या मुलांचे manual प्रमोशन करण्याच्या सुचना देण्यात आल्या.मागील वर्षी माहिती भरत असताना चुकून काही मुलांच्या entry या एका पेक्षा अधिक वेळा नोदवल्या गेल्या.अशा एका मुलाची एका पेक्षा अधिक नोंद आणे यालाच duplicate students असे म्हणावे.या एका मुलाच्या एका पेक्षा अधिक नोंदी system मधून काढून टाकणे गरजेचे आहे.म्हणजेच विद्यार्थी ट्रान्स्फर करण्या अगोदर अशा नोंदी काढण्याचे गरजेचे आहे.यासाठी student पोर्टल ला इतर सर्व काम सुरु करण्या अगोदर  Duplicate students शोधून त्यांच्या जास्तीच्या नोंदी काढणे गरजेचे आहे.
 duplicate students काढणे हे शाळा, तालुका, जिल्हा तसेच विभागीत स्तर आणि राज्य स्तरावरून काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.


शाळा स्तरावरून (within school) duplicate students शोधून त्यांना system मधून काढणे

    सर्वप्रथम आपण शाळा स्तरावरून duplicate student कसे काढावे याबाबत माहिती घेऊ.


    शाळा स्तरावरून duplicate students विद्यार्थी शोधण्याकरता मुख्याध्यापकाने आपले login करावे.मुख्याध्यापकाने login केल्यावर Duplicate students या tab ला क्लिक करावे.अभ्यासासाठी खालील स्क्रीन चा अभ्यास करा.


      

        वरील स्क्रीन मध्ये सदर शाळेमध्ये ६ विद्यार्थीच्या duplicate entry झालेल्या आपणास दिसून येत आहे.या पैकी आपण चार क्रमांकाच्या मुलाच्या म्हणजेच Sarthak Mohan Bhalerao या मुलाच्या duplicate entry कशा कमी करायच्या ते पाहणार आहोत.
       system द्वारे duplicate students ओळखण्यासाठी सदर विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव,त्याच्या आईचे संपूर्ण नाव आणि जन्मतारीख या तीन बाबी जशाच्या तशा नोंद झाल्या असतील तरच असे विद्यार्थी duplicate म्हणून ओळखले जातील याची नोंद घ्यावी.वरील स्क्रीन मधील सार्थक या मुलाच्या नावासमोर शेवटी दिसून येत असलेल्या  ३ नोंदी system मध्ये नोंद झालेल्या आहे हे लक्षात येते. आता जेवढ्या नोंदी झालेल्या आहेत त्या नोंदीवर आपण क्लिक करावे.म्हणजेच सार्थक च्या नावासमोर असलेल्या ३ या अंकावर आपण क्लिक करणारा आहोत.अभ्यासासाठी खालील स्क्रीन पहा.


         सार्थकच्या नावासमोर असलेल्या ३ या अंकावर क्लिक केल्यावर आपणास पुढील स्क्रीन पहायला मिळेल.




       अशा प्रकारे या शाळेमध्ये सार्थक च्या तीन duplicate नोंदी बाबत सविस्तर माहिती दाखवण्यात आलेली आहे.या माहिती पैकी जी नोंद बरोबर आहे किना जी नोंद आपणास ठेवायची आहे ती वगळता इतर दोन नोंदी आपणास delete करायची आहे हे लक्षात घ्यावे.
आता आपण क्रमांक ३ ची नोंद नोंद ही योग्य नोंद आहे असे समजून इतर दोन नोंदी आपणास delete करावयाच्या आहेत असे समजू.यासाठी आपण क्रमांक एक च्या नोंदी समोर असलेल्या delete या tab ला क्लिक करू.delete या tab वर क्लिक केल्यावर आपणास system confirmation चा मेसेज दाखवेल.




          दिसत असलेल्या confirmation message ला ओके केल्यावर सदर विद्यार्थी delete केला जाईल.आणे स्क्रीन वर student deleted successfully असा message दाखवेल.अभ्यासासाठी खालील स्क्रीन पहा.

         
          student deleted successfully असा message दाखवल्यावर आता duplicate students च्या मुख्य स्क्रीन वर सार्थक या विद्यार्थ्याच्या नावासमोर ३ ऐवजी २ नोंदी असल्याचे दिसून येईल.याचाच अर्थ असा आहे की ३ नोंदी पैकी १ नोंद आपण delete केली ती यशस्वीपणे delete झालेली आहे.

        अशाच प्रकारे सार्थक च्या राहिलेल्या २ नोंदीपैकी  एक नोंद अजून delete केली की ३ नोंदीपैकी २ नोंदी delete झालेल्या असतील.आणि आता मात्र सार्थक चे नाव duplicate students या माहितीमध्ये दिसणार नाही कारण आता सार्थकची एकच नोंद जी आपणास system मध्ये ठेवायची होती तीच नोंद शिल्लक राहील.परंतु सार्थक duplicate students च्या table मध्ये दिसणार नाही.
अशा प्रकारे विद्यार्थ्याची duplicate students म्हणून असलेल्या नोंदी मुख्याध्यापक login मधून आपणास system मधुन काढावयाच्या आहेत याची नोंद घ्यावी.जोपर्यंत आपण duplicate student entry काढून टाकत नाही तोपर्यंत त्या विद्यार्थ्याची माहिती ट्रान्स्फर अथवा update साठी उपलब्ध होणार नाही हे लक्षात घ्यावे. 



तालुका स्तरावरून (within blog) duplicate students शोधून त्यांना system मधून काढणे


            गटशिक्षणाधिकारी (beo) यांनी आपल्या login मधून अशा duplicate students ची माहिती घेऊन योग्य त्या विद्यार्थ्याची नोंद ठेवून इतर नोंदी delete करावयाच्या आहेत.

           सर्वप्रथम beo यांनी आपले login करावे.login केल्यावर मेनू मध्ये Duplicate student entry या नावाची tab दिसून येईल. अभ्यासासाठी खालील स्क्रीन पहा.


    Duplicate student entry या tab वर क्लिक केल्यावर खालील स्क्रीन दिसून येईल.या स्क्रीनवर आपणास ज्या मुलांची duplicate entry झालेली आहे अशा मुलांची यादी दिसून येईल.मुख्याध्यापक login प्रमाणे या login मध्ये देखील विद्यार्थ्याच्या नावासमोर असलेल्या entry च्या संख्येवर क्लिक करावे.


         विद्यार्थ्याच्या नावासमोर असलेल्या entry च्या संख्येवर क्लिक केल्यावर आपणास जेवढ्या वेळेला त्या विद्यार्थ्याच्या duplicate नोंदी झालेल्या असतील तेवढ्या नोंदी आपणास पुढील स्क्रीन वर पहावयास मिळेल. पुढील स्क्रीन मध्ये आपणास आकाश सुभाष शर्मा या विद्यार्थ्याच्या दोन नोंदी स्क्रीन वर पहावयास दिसत आहे.आता गटशिक्षणाधिकारी हे त्या दोन्ही खात्री  करून ठरवतील की विद्यार्थी कोणत्या शाळेत शिकत आहे.ज्या शाळेत विद्यार्थी नाही त्या शाळेच्या मुख्याध्यापकाला स्वतः गटशिक्षणाधिकारी त्या विद्यार्थ्याची नोंद delete करण्यासाठी प्रस्तावित करतील. अभ्यासासाठी खालील स्क्रीन पहा.


         जी नोंद आपणास delete साठी मुख्याध्यापकाला प्रस्तावित करावयाची आहे त्या नोंदीसमोर असलेली SELECT BOX मधील टिक मार्क काढून टाकावयाची आहे आणि Prapose to deletion या tab वर क्लिक करावयाचे आहे.ज्या विद्यार्थ्याची SELECT BOX  मधील टिक मार्क काढून टाकली जाईल तो विद्यार्थी delete करण्यासाठी त्या मुख्याध्यापकाला प्रस्तावित केला जाईल याची नोंद घ्यावी.त्यामुळे विद्यार्थी टिक मार्क काढताना काळजी घ्यावी. अभ्यासासाठी खालील स्क्रीन पहा.


         वरील स्क्रीन वर ok म्हंटल्यावर सदर विद्यार्थी हा delete करण्यासासाठी संबंधित मुख्याध्यापाकडे प्रस्तावित केला जाईल. अभ्यासासाठी खालील स्क्रीन पहा.



        गटशिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या login मधून विद्यार्थी delete करण्यासाठी ज्या मुख्याध्यापकाला पाठवला आहे त्या मुख्याध्यापकाने आता काय करावयाचे आहे ते पाहू.
आता संबंधित शाळेचे मुख्याध्यापक login करतील.
















          मुख्याध्यापकाने login केल्यावर Duplicate students या tab वर क्लिक करा.त्यामधील praposed deletion list या subtab ला क्लिक करा.


          वरील प्रमाणे praposed deletion list या subtab ला क्लिक केल्यावर आपणास गटशिक्षणाधिकारी यांनी ज्या विद्यार्थ्याला delete करण्यासाठी प्रस्तावित केले आहे त्या विद्यार्थ्याचे नाव पुढील स्क्रीन मध्ये आपणास दिसून येईल.त्या नावासमोर असलेल्या delete या बटनावर क्लिक करावे.अभ्यासासाठी पुढील स्क्रीन पहा.


               वरील स्क्रीन वर दाखवल्याप्रमाणे ok वर क्लिक करा.




             वरील स्क्रीन वर दाखवल्याप्रमाणे ok वर क्लिक करा.


         वरील स्क्रीन वर दाखवल्याप्रमाणे ok वर क्लिक करा.म्हणजे सदर विद्यार्थी delete होईल.विद्यार्थी delete झाल्यावर खालील स्क्रीन मधून त्याचे नाव निघून जाईल म्हणजेच त्या विद्यार्थ्याची duplicate entry  system मधून काढून टाकली जाईल.



           अशा प्रकारे आपण आपल्या तालुक्यातील duplicate student शोधून  काढून टाकणार आहोत.

     अशाच प्रकारे जिल्ह्यातील duplicate student हे शिक्षणाधिकारी यांना त्यांच्या login मधुन गटशिक्षणाधिकारी यांच्या login प्रमाणे delete करता येईल.

अधिक माहितीसाठी  pradipbhosle.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.
प्रदीप भोसले,हवेली,पुणे 
Email ID : idreambest@gmail.com 
WhatsApp Number : 9404683229 (Dont Call,Only WHATSAPP Message