महत्वाचे

सुचना

Pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.            .......

School Portal ऑफलाइन माहिती भरणे

  मागील वर्षी school पोर्टल मध्ये आपण online माहिती भरलेली आहे.मागील वर्षी माहिती भरत असताना आपणाकडे INTERNET असणे ही बाब खूप महत्वाची होती.इंटरनेट असल्याशिवाय आपणास school पोर्टल मध्ये काम करणे अशक्य होते.यामुळे वेळ आणि श्रम अती प्रमाणात खर्ची पडत असल्याचे लक्षात आले होते.त्यामुळे या वर्षी शासनाने या समस्येतून मार्ग काढून सर्व शाळांना सदर माहिती offline पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.सदर माहिती कशा पद्धतीने भरावी याबाबत खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी व माहिती भरावी.
   सर्वप्रथम एक बाब येथे लक्षात घेणे गरजेचे आहे की जरी सदर माहिती ही offline भरावयाची असली तरी ही माहिती भरण्यासाठी काही file आपणास मुख्याध्यापकाच्या login मधून download करणे गरजेचे आहे.खाली दिलेला चार्ट अभ्यासून आपण कशा पद्धतीने सदर माहिती भरावयाची आहे हे लक्षात घ्यावे.

आता आपण school पोर्टल मध्ये कशा पद्धतीने काम करावे हे सविस्तर पाहू.
१)       सर्वप्रथम education.maharashtra.gov.in या website ला open करावे.




२)       वरील page वरील शाळा या बटनावर क्लिक केल्यावर खालील page वरील school या बटनावर क्लिक करावे.

३)       या नंतर मुख्याध्यापकाने user id म्हणून शाळेचा udise नंबर टाकावा आणि school पोर्टल चा password टाकावा आणि login करावे.





४)       खालील स्क्रीन वरील Download offline Saral Software आणि Download Saral Data या दोन taब वर क्लिक करून सदर offline प्रोजेक्ट download करावयाचा आहे.या ठिकाणी हे लक्षात घ्यावे की आपणास २ zip file download करावयाच्या आहेत.





सर्वप्रथम Download offline Saral Software या बटनावर क्लिक केल्यावर आपण जो project download करणार आहोत तो कोणत्या भाषेत download करणार आहोत ती भाषा विचारली जाईल.त्या भाषेला निवडावे  आणि download या बटनावर क्लिक करावे.





५)       यानंतर आपणास एक सुचना दिसून येईल त्या सूचनेस आपण ok करावे.
६)       ok बटनावर क्लिक केले की काही वेळ आपणास पुढील स्क्रीन दिसून येईल.आपण पुढील प्रक्रिया होईपर्यंत वाट पहावी.

७)       अ) जर आपण mozilla या browser मध्ये काम करत असाल तर आपणास पुढील स्क्रीन दिसून येईल.


या स्क्रीन मध्ये page च्या वरच्या बाजूला एक Pop-up window alert ची एक notification आलेली दिसून येईल.या notification च्या शेवटी असलेल्या option बटनावर क्लिक करून आलेल्या option पैकी सर्वात वरचा म्हणजे Allow pop-up for education.maharashtra.gov.in या option ला क्लिक करावे.यानंतर लगेच आपल्या computer च्या स्क्रीन वर पुढील स्क्रीन दिसून येईल.

या स्क्रीन मध्ये open या बटनावर ऑटो क्लिक आहे असे दिसून येईल.ते आपण change करून save file या बटनावर करून घ्यावे आणि ok या बटनावर शेवटी क्लिक करावे.अभ्यासासाठी पुढील स्क्रीन पहावी.

यानंतर लगेचच आपल्या computer मध्ये एक zip file download झालेली आपणास पहावयास मिळेल.अशाच प्रकारे आपण खालील स्क्रीन वर असलेली Download Saral Data  या tab वर क्लिक करून आणखी एक zip फिले download करून घ्यायची आहे.


या दोन file download झाल्यानंतर त्या शोधण्यासाठी आपण mozilla browser वापरकर्ते खालील प्रमाणे पाहू शकाल.

Download झालेली zip file शोधण्यासाठी आपण वरील स्क्रीन वरील दिसणाऱ्या file ला right क्लिक करून open Containing folder या option ला क्लिक करून खालील प्रमाणे शोधू शकाल.
 यानंतर त्या file ज्या फोल्डर मध्ये save झाल्या असतील त्या दिसून येतील.

    या दोन zip file आपणास आपल्या संगणकाच्या C या Drive वर ठेवायच्या नाही आहे ही महात्वाची बाब आपणास लक्षात ठेवणे गरजेचे आहे. या दोन्ही file या आपण आपल्या संगणकाच्या C drive वगळता इतर कोणत्याही drive मध्ये ठेवू शकता.आपण सदर file या pen drive मध्ये ठेवल्या तरी सुद्धा चालू शकणार आहे याची नोंद घ्यावी.आपल्या कामाच्या दृष्टीने आपण सदर file या एका वेगळ्या drive मध्ये वेगळ्या फोल्डर मध्ये ठेवाव्या.आणि त्या फोल्डर चे नाव saral असे असू द्यावे. सदर file या cut-paste करून दुसऱ्या फोल्डर मध्ये ठेवाव्यात.खालील स्क्रीन पहा.
वरील स्क्रीन मध्ये दोन्ही file cut केल्या आहेत.आता त्या file आपण D drive मध्ये saral नावाचे फोल्डर तयार करून paste करायच्या आहेत.
paste केल्यावर त्या दोन्ही file या फोल्डर मध्ये आलेल्या दिसतील.


ब)      जर आपण crome  या browser मध्ये काम करत असाल तर Download offline Saral Software या बटनावर क्लिक  केल्यावर आपणास पुढील स्क्रीन दिसून येईल.या स्क्रीन मध्ये सर्वात वरती pop-up blocked ची notification आलेली दिसून येईल.या notification च्या pop-up blocked या बटनावर क्लिक केल्यावर दिसून येत असलेल्या always allow pop-ups from education.maharashtra.gov.in या option ला निवडून घ्यावे.त्यानंतर लगेचच crome browser च्या स्क्रीन च्या खालच्या बाजूला zip file download होत असलेली दिसून येईल.download झाल्यावर सदर file ला शोधण्यासाठी त्या file च्या शेजारी असलेल्या बटनावर क्लिक करून show in folder या option ला क्लिक करावे. 
 

show in folder या option ला क्लिक केल्यावर ती file ज्या folder मध्ये save झालेली आहे ते folder खालील प्रमाणे दिसून येईल. त्या file ज्या फोल्डर मध्ये save झाल्या असतील त्या दिसून येतील.
  

या दोन zip file आपणास आपल्या संगणकाच्या C या Drive वर ठेवायच्या नाही आहे ही महात्वाची बाब आपणास लक्षात ठेवणे गरजेचे आहे.या दोन्ही file या आपण आपल्या संगणकाच्या c drive वगळता इतर कोणत्याही drive मध्ये ठेवू शकता.आपण सदर file या pen drive मध्ये ठेवल्या तरी सुद्धा चालू शकणार आहे याची नोंद घ्यावी.आपल्या कामाच्या दृष्टीने आपण सदर file या एका वेगळ्या drive मध्ये वेगळ्या फोल्डर मध्ये ज्याचे नाव saral असेल त्यात ठेवाव्या.
सदर file या cut-paste करून दुसऱ्या फोल्डर मध्ये ठेवाव्यात.खालील स्क्रीन पहा.

वरील स्क्रीन मध्ये दोन्ही file cut केल्या आहेत.आता त्या file आपण D drive मध्ये saral नावाचे फोल्डर तयार करून paste करायच्या आहेत.

paste केल्यावर त्या दोन्ही file या फोल्डर मध्ये आलेल्या दिसतील.


८)       वरील स्क्रीन मध्ये दाखवल्याप्रमाणे आता आपण त्या दोन्ही zip file ला extract करावे.
९)        

पहिल्या file ला extract केल्यावर आपणास दोन फोल्डर तयार झालेले दिसेल.अभ्यासासाठी खालील स्क्रीन पहा.

दुसऱ्या zip file ला Extract करा.

त्या file ला Extract केल्यावर अजून काही फोल्डर तयार होतील.खालील स्क्रीन पहा.


वरील स्क्रीन मध्ये आपणास दिसून येत असलेल्या कोणत्याही फोल्डर मध्ये काहीही बदल करू नये अथवा माहिती save करू नये.वरील स्क्रीन मध्ये दिसून येत असलेल्या Saral.html  या file ला आपण फक्त Internet Explorer मध्येच  open करावयाचे आहे,इतर browser मध्ये offline data entry चे काम करण्यात येऊ नये.अन्यथा माहिती स्वीकारली जाणार नाही.ही प्रोसेस कशी करावी यासाठी खालील स्क्रीन पहा.



परंतु internet explorer मध्ये file open करण्याच्या आधी आपणास Internet explorer या browser मध्ये काही बदल करावयाचे आहे हे लक्षात घ्यावे. Internet explorer च्या setting मध्ये कोणकोणते बदल करावयाचे आहे हे लक्षात घेणे या ठिकाणी महत्वाचे आहे.अभ्यासासाठी खालील स्क्रीन पहा.






Internet  Explorer  ActiveX  Settings  for  Offline  entry
टीप : आपले Internet explorer browser चे व्हर्जन हे
Internet explorer 9  व त्यापुढील असावे याची नोंद घ्यावी.
अ)    Internet explorer च्या Tool या tab ला क्लिक करा आणि त्यानंतर internet options या बटनावर क्लिक करा.





आ)  यानंतर security या बटनावर क्लिक करा.

इ) “Enable Protected Mode” असे लिहिलेले असेल त्या ठिकाणी select केलेले आहे असे दिसत असेल तर तेथील टीक मार्क काढून टाका.म्हणजेच unchek करा. अभ्यासासाठी खालील स्क्रीन पहा.
ई) यानंतर खालच्या बाजूला custom level या बटनावर क्लिक करा आणि ActiveX controls and Settings या option च्या पुढे असणाऱ्या subtab मध्ये खाली दिलेल्या screenshot प्रमाणे बदल करून घ्या.



शेवटी   “Ok”  या बटनावर क्लीक करा आणि त्यानंतर Apply या बटनावर क्लिक करा.यानंतर आपले browser restart करा आणि खाली दिलेल्या स्क्रीन प्रमाणे आपल्या folder मधील index या file ला internet explorer मधून open करा. अभ्यासासाठी खालील स्क्रीन पहा.


सदर file internet explorer मधून open केल्यावर खालील प्रमाणे दिसेल.

वरील स्क्रीन मध्ये आपणास एकूण १२ tab दिसत आहे.त्या मध्ये आपण समजण्यासाठी प्रयेकी ६ tab चे दोन भाग करू.त्यातील एक भाग हा सरल school पोर्टल चा आहे आणि दुसरा भाग हा सरल student summary चा आहे.अभ्यासासाठी खालील स्क्रीन पहा.
आता आपण सरल school पोर्टल च्या ६ tab ची सविस्तर माहिती घेऊ.
१)       School data input format : सरल school पोर्टल मध्ये आपण मागील वर्षी प्रत्येक स्क्रीन निहाय माहिती भरलेली आहे.या वर्षी देखील आपणास स्क्रीन निहाय माहिती भरायची आहे.या प्रत्येक स्क्रीन मध्ये मागील वर्षी कोणकोणत्या प्रकारची माहिती भरलेली आहे आणि त्यासमोरच कोणती माहिती भरायची आहे यासाठी रिकामी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.जेणेकरून माहिती भरताना आपणास या वर्षी माहिती भरताना मागील वर्षीच्या माहितीची मदत मिळेल.तसेच आपणास आवश्यक वाटल्यास सदर form हा print करून घेऊन आपण कच्चे काम म्हणून वापरू शकता.सदर input format कसा असेल हे जाणून घेण्यासाठी खालील स्क्रीन अभ्यासा.




2) School Data Entry : या tab मध्ये आपणा सर्वात जास्त काम करावयाचे आहे.या tab ला क्लिक केल्यावर आपणास खालील स्क्रीन उपलब्ध होईल.
 
वरील स्क्रीन पाहिल्यावर आपल्या लक्षात आले असेल की मागील वर्षी आपण school पोर्टल ची online माहिती भरताना वरील स्क्रीन अभ्यासलेली आहे.ज्या प्रमाणे आपण online माहिती भरतो अगदी त्याचप्रमाणे  School Data Entry या tab ला क्लिक केल्यावर उपलब्ध झालेल्या वरील स्क्रीन मध्ये एक एक स्क्रीन मध्ये माहिती भरायची आहे.माहिती भरत असताना पत्येक स्क्रीन मध्ये माहिती भरली की ती स्क्रीन save आणि finalize करावयाची आहे याची नोंद घ्यावी.जर एखाद्या स्क्रीन मध्ये माहिती भरावयाची नसेल अथवा एखादी स्क्रीन आपणास लागू नसेल तरीदेखील ती स्क्रीन आपणास update आणि finalize करणे गरजेचे आहे.सदर माहिती भरताना आपण आपल्याला लागू नसलेली माहिती जरी आपले offline software स्वीकारत असेल तरी आपण ती माहिती भरू नये.अन्यथा ती माहिती system स्वीकारणार नाही.सदर माहिती भरत असताना कोणतेही फोटो अथवा document upload करावयाचे नाही आहे हे लक्षात घ्यावे.सदर माहिती भरत असताना एखादी स्क्रीन finalize केली असेल तरी देखील आपण पुन्हा त्या स्क्रीन मध्ये नव्याने माहिती भरू शकाल.finalize ही tab आपणास आपले काम किती झाले यासाठी दिलेली आहे हे लक्षात घ्यावे. save केल्यावर सदर स्क्रीन tab चा रंग हा केशरी आणि finalize केल्यावर सदर स्क्रीन tab चा रंग हिरवा होतो हे लक्षात घ्यावे. अशा प्रकारे आपण सर्व स्क्रीन भरणार आहोत.

३) School Manual : या मध्ये आपणास offline पद्धतीने माहिती कशी भरावी याबाबत manual उपलब्ध करून दिलेले आहे.

४) school checklist : school checklist या tab मध्ये शाळेणे मागील वर्षी जी माहिती school पोर्टल ला भरलेली आहे ती माहिती आणि या वर्षी आपण जी माहिती offline भरत आहात ती माहिती अशा दोन्ही वर्षांची माहिती या tab मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.
५) School Progress Bar : या tab मध्ये आपण स्क्रीन निहाय भरलेली माहिती,save केलेली माहिती ,finalize केलेली माहिती आणि पूर्ण कामाची टक्केवारी या बाबतीत माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
6) Prepare Data For School : offline माहिती संपूर्ण भरून झाल्यानंतर आपण या tab चा उपयोग करणार आहोत.या tab वर क्लिक केले की आपल्या कॉम्पुटर मध्ये आपण भरलेल्या माहितीची एक zip file तयार होते.जी file आपणास शाळेच्या login ला upload करावयाची आहे.


आपण Prepare Data For School या tab ला क्लिक केले की आपल्या कॉम्पुटरच्या स्क्रीन वर file save करण्याबाबत सुचना दिसून येते.आपण save म्हणून क्लिक केले की आपल्या कॉम्पुटर मध्ये एक zip file save होते.
 
वरील स्क्रीन मधील open फोल्डर या बटनावर क्लिक केल्यास आपणास ज्या फोल्डर मध्ये zip file तयार झालेली आहे ती दिसून येईल.

आता या zip file ला आपण शाळेच्या login ला जाऊन upload करणार आहोत हे लक्षात घ्या.upload कसे करावे यासाठी खालील स्क्रीन पहा.
सर्वप्रथम education.maharashtra.gov.in या website मध्ये शाळा login करा आणि पहिल्याच पानावर असलेल्या upload या बटनावर क्लिक करा.

upload या बटनावर क्लीक केल्यावर आपणास पुढील स्क्रीन दिसेल.

वरील स्क्रीन वर Upload Data या बटनाला क्लिक करा. Upload Data या बटनावर क्लिक केल्यावर आपण offline software मधून तयार केलेली file select करण्यासाठी योग्य पाथ विचारला जाईल.या बाबतीत आपणास पुढील स्क्रीन दिसेल.

माहिती भरल्यानंतर तयार असलेल्या zip file ला select करा व open वर क्लिक करा.open वर क्लिक केल्यानंतर त्या file चा पाथ स्क्रीन वर दिसेल. यानंतर upload data या tab वर क्लिक करा.
यानंतर आपली माहिती website ला upload होईल. 

upload झाल्यानंतर आपणास upload successfully ची सुचना स्क्रीन वर पाहायला मिळेल.आता आपण शाळेचे login करून आपली माहिती व्यवस्थित दिसून येत आहे का हे बघू शकाल.


महत्वाची सुचना :
१)       आपण offline माहिती भरताना प्रत्येक स्क्रीनमध्ये माहिती भरायची आहे.ही माहिती save आणि finalize करणे गरजेचे आहे.आपण save केलेली माहिती योग्य असेल (जरी finalize केलेली नसेल) तर upload केल्यानंतर ती माहिती शाळा लेवल मध्ये finalize झालेली पहायला मिळेल.एखादी स्क्रीन जरी आपण offline माहितीमध्ये finalize केली असेल परंतु प्रत्यक्षात ती माहिती चुकली असेल तर ती स्क्रीन online माहितीमध्ये शाळा login ला finalize होणार नाही ता ती save होईल.तेंव्हा अशा वेळी आपण offline माहिती upload केल्यावर माहिती योग्य प्रकारे भरली गेली किंवा नाही हे तपासून पहावे.
२)       एखाद्या शाळेला internet सुविधा नसल्याची समस्या असेल तर त्या शाळेसाठी file download आणि upload ची सुविधा केंद्रप्रमुख (cluster) आणि गटशिक्षणाधिकारी (BEO) यांच्या login ला उपलब्ध करून देण्यात आली आहे याची नोंद घ्यावी.
३)       या माहितीपत्रकात आपण school पोर्टल ची माहिती कशी भरावी हे पाहिले आहे.तसेच उर्वरीत सहा tab म्हणजेच STUDENT SUMMARY च्या बाबत वेगळे MANUAL उपलब्ध करून दिले जाईल.
महत्वाची सुचना : offline data entry चे काम संपल्यानंतर आपल्या internet explorer ची default setting करावी. (For security reason)…