महत्वाचे

सुचना

Pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.            .......

Pramotion

             शैक्षणीक वर्ष पूर्ण झाल्यावर विद्यार्थी हा पुढच्या वर्गात जातो किंवा अनुतीर्ण झाल्यास त्याच वर्गात राहतो.परंतु RTE च्या नियमानुसार इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यास अनुत्तीर्ण करता येत नाही.म्हणजेच कोणताही  विद्यार्थी इयत्ता ८ वी प्रत्येक वर्षी पुढच्या वर्गात शिकत असतो.तसेच इयत्ता ९ वी पासून पुढे मात्र विद्यार्थी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण होऊ शकतो.या सर्व नियमांचा अभ्यास करून  विद्यार्थ्यांचे प्रमोशन केले जाते. परंतु सरल मध्ये ही बाब दर्शविण्यासाठी अशा सर्व मुलांचे पुढील शैक्षणिक वर्षात पुढच्या वर्गात किंवा त्याच वर्गात प्रमोशन होणे गरजेचे आहे.यासाठी Student पोर्टल मध्ये तशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.या सर्व बाबींचा सविस्तर विचार करुंया....

सर्वप्रथम इयत्तानिहाय प्रमोशन प्रक्रिया कशी अपेक्षित आहे हे समजून घेऊ..

    १) इयत्ता १ ली ते ८ वी : system द्वारे ऑटो प्रमोशन. 
   २) इयता ९ वी ते १२ वी : Manual प्रमोशन  

इयत्ता १ ली ते ८ वी : system द्वारे ऑटो होणारे प्रमोशन.
   
          इयत्ता १ ली ते ८ वी या वर्गातील मुलांचे प्रमोशन हे system द्वारे automatic केले जाते.RTE च्या नियमानुसार कोणत्याही विद्यार्थ्यास अनुत्तीर्ण केले जात नाही.म्हणून अशा सर्व मुलांना पुढील वर्गात प्रमोट केले जाते.ही प्रक्रिया system द्वारे पूर्ण केली जाते.त्यामुळे या वर्गातील मुलांचे प्रमोशन करण्यासाठी कोणत्याही शाळेला काहीही करण्याची आवशकता  नाही आहे.  

इयता ९ वी ते १२ वी : Manual प्रमोश.

            इयत्ता ९ वी ते १२ वी च्या मुलांचे प्रमोशन हे मुख्याध्यापकाने स्वतः करावयाचे आहे.इयत्ता ९ वी पासून पुढे विद्यार्थी अनुत्तीर्ण होऊ शकत असल्याने ही प्रक्रिया system द्वारे न करता Manually पद्धतीने मुख्याध्यापकाने करणे अपेक्षित आहे.  ही प्रक्रिया कशी  करावी याबाबत खाली सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.  इयत्ता ९ वी ते १२ वी च्या मुलांचे प्रमोशन करताना आपण समजून घेण्यासाठी काही प्रकार करून समजून घेऊ.
          
               १)  इयत्ता १० वी चे प्रमोशन (फक्त माध्यामिक शाळा 
               २) इयत्ता १० वी चे प्रमोशन (माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा )

                       अ) same school

                                              ब) Different School 
            ३) इयत्ता १२वी च्या मुलांचे प्रमोशन 

        ४)  इयत्ता ९ वी व ११ वी च्या विद्यार्थ्यांचे प्रमोशन
                                             आता वरील सर्व प्रकार आपण सविस्तर पाहुया.....

१)  इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांचे  प्रमोशन (फक्त माध्यामिक शाळा)
    
         आपण अशा शाळेच्या प्रमोशनचा विचार करू की ज्या शाळेत शेवटचा वर्ग हा इयत्ता १० वी हा आहे. अशा शाळेने विद्यार्थ्यांचे प्रमोशन कसे कारावे ही आता समजून घेऊ.
          सर्व प्रथम मुख्याध्यापकाने आपल्या शाळेचे student पोर्टल ला Login करावे आणि Login केल्यावर मुख्य Tab पैकी असलेल्या  Student Promotion  या बटनावर क्लिक करावे.

वरील प्रमाणे  Student Pramotion  या बटनावर क्लिक केल्यावर आपणास पुढील स्क्रीन प्राप्त होते.यामध्ये विचारलेल्या सर्व बाबी अचूक  भरणे अपेक्षित आहे.

यानंतर वरील स्क्रीन वर असलेली सर्व माहिती भरून घेऊया.

वरील प्रमाणे इयत्ता १० वीच्या वर्गाची सर्व माहिती भरून झाली की खालील स्क्रीन ओपेन झालेली दिसून येईल.

   वर दिसत असलेल्या स्क्रीनवरील इयत्ता १० वी च्या  सर्व मुलांची माहिती दिलेल्या नमुन्यात भरावयाची आहे.विद्यार्थी उत्तीर्ण असो अथवा अनुत्तीर्ण असो परंतु वरील फॉर्म मध्ये प्रत्येकाची माहिती भरणे अपेक्षित आहे.खाली दिलेल्या पद्धतीने सर्व मुलांची माहिती भरून घ्यावी.अभ्यासाठी खालील स्क्रीन चा अभ्यास करावा.

   वरील स्क्रीन मध्ये विद्यार्थ्यांची माहिती कशी भरावी हे समजण्यासाठी Absent,Failed आणि Pass अशा प्रकाराचे उदाहरण दिलेले आहे.या बाबीचा अभ्यास करावा...

  ज्या विद्यार्थ्यांची माहिती भरावयाची आहे त्या विद्यार्थ्यास select करावे.

   सदर विद्यार्थी Absent किंवा Fail असेल तर तशी टीक मार्क करून नोंद घ्यावी आणी विद्यार्थी Absent किंवा Fail नसून पास असेल तर अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत Percentage च्या रकान्यात माहिती भरावी.अशा मुलांच्या बाबतीत Remark देखील नोंद करून घ्यावा व सर्वात शेवटी असलेले Save Record या बटनावर क्लिक करावे.अशा पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांची नोंद घेऊन आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रमोशन करावयाचे आहे.

२) इयत्ता १० वी चे प्रमोशन (माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा )

                       अ) same school

                           ब) Different School

     आता आपण अशा शाळेच्या १० वी वर्गाचे प्रमोशन पहाणार आहोत ज्यांच्या शाळेला जोडूनच ११ वी चा वर्ग आहे.अशा शाळेतील १० वीचे विद्यार्थी हे पास झाल्यावर एकतर ते त्याच शाळेच्या ११ वी वर्गाला प्रवेश घेतील किंवा इतर शाळेत ११  वी साठी प्रवेश घेतील.अशा प्रकारात स्वतः च्या शाळेमधील प्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रमोशन करण्यासाठीच्या प्रक्रियेस   Promotion in Same School असे म्हणावे आणि इतर शाळेमधील प्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रमोशन करण्यासाठीच्या प्रक्रियेस   Promotion in Other School असे म्हणावे लागेल.
  आता या दोन्ही प्रकारानुसार प्रमोशन कसे करावे हे समजून घेऊ.
              
                    अ) Promotion In same school

सर्व प्रथम मुख्याध्यापकाने आपल्या शाळेचे student पोर्टल ला Login करावे आणि Login केल्यावर मुख्य Tab पैकी असलेल्या  Student Promotion  या बटनावर क्लिक करावे. 

       वरील प्रमाणे  Student Pramotion  या बटनावर क्लिक केल्यावर आपणास पुढील स्क्रीन प्राप्त होते.यामध्ये विचारलेल्या सर्व बाबी अचूक  भरणे अपेक्षित आहे.
वरील माहिती भरत असताना ज्या शाळेला जोडून  इयत्ता ११ वी आहे अशा शाळांना आपोआप खालील स्क्रीन मध्ये दिसत असलेल्या Same School आणि Different School असे दोन पर्याय उपलब्ध झालेले दिसून येतात.

आपण पहात असलेले उदाहरण हे आपल्याच शाळेच्या इयत्ता ११ वी ला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे असल्याने आपण आता Same School या बटनाला क्लिक करणार आहोत.

यानंतर आपणास खालील स्क्रीन आलेली दिसून येईल.या स्क्रीन मध्ये विचारल्याप्रमाणे सदर विद्यार्थ्यांचे प्रमोशन हे कोणत्या वर्गात व शाखेत आणी तुकडीत  करावयाचे आहे हे नमूद करावे आणि वर स्पष्ट केलेल्या उदाहरणाप्रमाणे या विद्यार्थ्यांची माहिती प्रमोशन करण्यासाठी भरून घ्यावी.

     वरील स्क्रीन मध्ये विद्यार्थ्यांची माहिती कशी भरावी हे समजण्यासाठी Absent,Failed आणि Pass अशा प्रकाराचे उदाहरण दिलेले आहे.या बाबीचा अभ्यास करावा...

  ज्या विद्यार्थ्यांची माहिती भरावयाची आहे त्या विद्यार्थ्यास select करावे.

   सदर विद्यार्थी Absent किंवा Fail असेल तर तशी टीक मार्क करून नोंद घ्यावी आणी विद्यार्थी Absent किंवा Fail नसून पास असेल तर अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत Percentage च्या रकान्यात माहिती भरावी.अशा मुलांच्या बाबतीत Remark देखील नोंद करून घ्यावा व सर्वात शेवटी असलेल्या Promote  या बटनावर क्लिक करावे.अशा पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांची नोंद घेऊन आपल्या शाळेतील १० वी च्या विद्यार्थ्यांचे आपल्याच  शाळेतील ११ वी च्या वर्गात प्रमोशन करावयाचे आहे.

) Promotion In Different school

सर्व प्रथम मुख्याध्यापकाने आपल्या शाळेचे student पोर्टल ला Login करावे आणि Login केल्यावर मुख्य Tab पैकी असलेल्या  Student Promotion  या बटनावर क्लिक करावे. 

      वरील प्रमाणे  Student Pramotion  या बटनावर क्लिक केल्यावर आपणास पुढील स्क्रीन प्राप्त होते.यामध्ये विचारलेल्या सर्व बाबी अचूक  भरणे अपेक्षित आहे.

      वरील माहिती भरत असताना ज्या शाळेला जोडून  इयत्ता ११ वी आहे अशा शाळांना आपोआप खालील स्क्रीन मध्ये दिसत असलेल्या Same School आणि Different School असे दोन पर्याय उपलब्ध झालेले दिसून येतात.

आपण पहात असलेले उदाहरण हे इतर  शाळेच्या इयत्ता ११ वी ला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे असल्याने आपण आता Different School या बटनाला क्लिक करणार आहोत.

वर दिसत असलेल्या स्क्रीनवरील इयत्ता १० वी च्या  सर्व मुलांची माहिती दिलेल्या नमुन्यात भरावयाची आहे.विद्यार्थी उत्तीर्ण असो अथवा अनुत्तीर्ण असो परंतु वरील फॉर्म मध्ये प्रत्येकाची माहिती भरणे अपेक्षित आहे.खाली दिलेल्या पद्धतीने सर्व मुलांची माहिती भरून घ्यावी.अभ्यासाठी खालील स्क्रीन चा अभ्यास करावा.

वरील स्क्रीन मध्ये विद्यार्थ्यांची माहिती कशी भरावी हे समजण्यासाठी Absent,Failed आणि Pass अशा प्रकाराचे उदाहरण दिलेले आहे.या बाबीचा अभ्यास करावा...

  ज्या विद्यार्थ्यांची माहिती भरावयाची आहे त्या विद्यार्थ्यास select करावे.

   सदर विद्यार्थी Absent किंवा Fail असेल तर तशी टीक मार्क करून नोंद घ्यावी आणी विद्यार्थी Absent किंवा Fail नसून पास असेल तर अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत Percentage च्या रकान्यात माहिती भरावी.अशा मुलांच्या बाबतीत Remark देखील नोंद करून घ्यावा व सर्वात शेवटी असलेले Save Record या बटनावर क्लिक करावे.अशा पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांची नोंद घेऊन आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रमोशन करावयाचे आहे.

३)  इयत्ता ११ वी च्या मुलांचे प्रमोशन 
आपण अशा शाळेच्या प्रमोशनचा विचार करू की ज्या शाळेत ११ वी,१२ वी वर्ग आहे.अशा शाळेने ११ वी च्या विद्यार्थ्यांचे प्रमोशन कसे करावे ही आता समजून घेऊ.सर्व प्रथम मुख्याध्यापकाने आपल्या शाळेचे student पोर्टल ला Login करावे आणि Login केल्यावर मुख्य Tab पैकी असलेले Student Pramotion  या बटनावर क्लिक करावे.

      वरील प्रमाणे  Student Promotion  या बटनावर क्लिक केल्यावर आपणास पुढील स्क्रीन प्राप्त होते.यामध्ये विचारलेल्या सर्व बाबी अचूक  भरणे अपेक्षित आहे.

या नंतर खालील स्क्रीन वर असलेली सर्व माहिती भरून घेऊया.

वरील प्रमाणे माहिती भरल्यानंतर खाली दिसत असलेल्या स्क्रीन प्रमाणे स्क्रीन आपणास दिसून येईल.

खाली दिसत असलेल्या स्क्रीन प्रमाणे आपणास आपल्यासमोर एक स्क्रीन दिसून येईल.

खाली दिलेल्या स्क्रीन प्रमाणे विद्यार्थी कोणत्या वर्गात आणि शाखेत प्रवेश घेऊ इच्छितो त्याप्रमाणे माहिती नमूद करावी.एक बाब येथे लक्षात घ्यावे एकी जर विद्यार्थी १२ वी ला प्रमोट होताना आपली शाखा बदलू इच्छित असेल तर या सुविधेद्वारे तो आपली शाखा प्रमोट होताना बदलवू शकेल.

खालील स्क्रीन मध्ये विद्यार्थ्यांची माहिती कशी भरावी हे समजण्यासाठी Absent,Failed आणि Pass अशा प्रकाराचे उदाहरण दिलेले आहे.या बाबीचा अभ्यास करावा.
ज्या विद्यार्थ्यांची माहिती भरावयाची आहे त्या विद्यार्थ्यास select करावे.
सदर विद्यार्थी Absent किंवा Fail असेल तर तशी टीक मार्क करून नोंद घ्यावी.आणी विद्यार्थी Absent किंवा Fail नसून पास असेल तर अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत Percentage च्या रकान्यात माहिती भरावी.अशा मुलांच्या बाबतीत Remark देखील नोंद करावे.

सर्व माहिती भरून झाली की सर्वात शेवटी असलेले Pramoteया बटनावर क्लिक करावे.

४) इयत्ता १२वी च्या मुलांचे प्रमोशन
आपण अशा शाळेच्या प्रमोशनचा विचार करू की ज्या शाळेत १२ वी वर्ग आहे.अशा शाळेने १२ वी च्या विद्यार्थ्यांचे प्रमोशन कसे करावे ही आता समजून घेऊ.सर्व प्रथम मुख्याध्यापकाने आपल्या शाळेचे Student पोर्टल ला Login करावे आणि Login केल्यावर मुख्य Tab पैकी असलेले Student Promotion  या बटनावर क्लिक करावे.

    वरील प्रमाणे  Student Promotion  या बटनावर क्लिक केल्यावर आपणास पुढील स्क्रीन प्राप्त होते.यामध्ये विचारलेल्या सर्व बाबी अचूक  भरणे अपेक्षित आहे.

   खालील स्क्रीन मध्ये विद्यार्थ्यांची माहिती कशी भरावी हे समजण्यासाठी Absent,Failed आणि Pass अशा प्रकाराचे उदाहरण दिलेले आहे.या बाबीचा अभ्यास करावा.

   ज्या विद्यार्थ्यांची माहिती भरावयाची आहे त्या विद्यार्थ्यास select करावे.

   सदर विद्यार्थी Absent किंवा Fail असेल तर तशी टीक मार्क करून नोंद घ्यावी.आणी विद्यार्थी Absent किंवा Fail नसून पास असेल तर अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत Percentage च्या रकान्यात माहिती भरावी.अशा मुलांच्या बाबतीत Remark देखील नोंद करावे आणि शेवटी असलेल्या Save Record या बटनावर क्लिक करावे.अभ्यासासाठी खालील स्क्रीन पहावी.